वन जमिनीवरील अतिक्रमणावर कारवाई

वन जमिनीवरील अतिक्रमणावर कारवाई

वन जमिनीवरील अतिक्रमणावर कारवाई
खर्डी, ता. १५ (बातमीदार) : धसई वनपरिक्षेत्रातील अस्नोली परिमंडळ कार्यक्षेत्रातील गेगाव येथील १८ हेक्टर वन जमिनीवर शेतीच्या नावाखाली स्थानिक रहिवाशांनी वनविभागाची कोणतीही परवानगी न घेता अतिक्रमण केले होते. या अतिक्रमणावर शहापूर वन विभागाच्या पथकाने कारवाई केली आहे.

वन विभागाच्या या धडक कारवाईमुळे वन जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. शहापूर वन विभागाचे उपवन संरक्षक सचिन रेपाल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वन संरक्षक भाग्यश्री पोले, धसई वनपरिक्षेत्राधिकारी डी. व्ही. ठाकूर, वनपरिक्षेत्र अधिकारी बी. पी. चंद्रात्रे, दक्षता पथक, डोळखांब रेंज स्टाफ, धसई रेंज स्टाफ, भरारी पथक स्टाफ यांनी किन्हवली पोलिसांच्या मदतीने कारवाई केली. वन विभागाच्या या कारवाईने वन जमिनी बेकायदेशीर हस्तांतरित करून त्यावर कब्जा करणाऱ्या भूमाफियांचे धाबे दणाणले आहेत. या कारवाईने १८ हेक्टर वनजमिनीने अतिक्रमणाचा मोकळा श्वास घेतला आहे.

वनविभागाच्या जागेवर बेकायदेशीर अतिक्रमण करणे, हा कायद्याने गुन्हा आहे, शहापूर तालुक्यातील रहिवाशांनी वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण करणे टाळावे, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल.
- सचिन रेपाल, उपवनसंरक्षक, शहापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com