म्हस्के-मेन्डोन्सांमध्ये बंद दाराआड चर्चा

म्हस्के-मेन्डोन्सांमध्ये बंद दाराआड चर्चा

भाईंदर, ता. १५ (बातमीदार) : मिरा-भाईंदरचे माजी आमदार गिल्बर्ट मेन्डोन्सा यांनी लोकसभा निवडणुकीतील आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नव्हती. त्यामुळे निवडणुकीत मेन्डोन्सा कोणाला पाठिंबा देतात, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता लागून राहिली होती. असे असताना महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी बुधवारी मेन्डोन्सा यांची भेट घेऊन बंद दाराआड चर्चा केली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मेन्डोन्सा यासंदर्भात लवकरच आपली भूमिका जाहीर करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर २००९ मध्ये मेन्डोन्सा मिरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले. त्या आधी त्यांनी सरपंच व नगराध्यक्ष पदही भुषवले आहे. त्यांची पत्नी व कन्या महापालिकेत महापौर म्हणून निवडून आल्या होत्या. त्यामुळे सध्या कोणत्याही पदावर नसतानाही त्यांना मानणारा एक वर्ग आजही आहे. २०१७ मध्ये एका कायदेशीर प्रकरणात एकनाथ शिंदे व राजन विचारे यांनी मोलाची मदत केली होती. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला आणि महापालिका निवडणुकीत स्वत:चे चार नगरसेवक निवडून आणले. त्यामुळे शिवसेनेतही त्यांचा दबदबा कायम राहिला. शिवसेना फुटीनंतर मात्र मेन्डोन्सा हे राजकारणात फारसे सक्रिय राहिले नाहीत अथवा त्यांनी स्वत:ची भूमिकाही स्पष्ट केली नाही. त्यांचे समर्थक असलेल्या चार नगरसेवकांपैकी दोघो आज खासदार राजन विचारे यांच्यासोबत आहेत. त्यामुळे मेन्डोन्सा लोकसभा निवडणुकीत नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com