पंकज देशमुखांची उमेदवारी होणार निश्चित?

पंकज देशमुखांची उमेदवारी होणार निश्चित?

पंकज देशमुखांची उमेदवारी होणार निश्चित?
ठाकरे गटाकडून घोषणा बाकी; कोकण पदवीधरसाठी जय्यत तयारी
विरार, ता. १५ : पालघर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा रणसंग्राम महाविकास आघाडीने अत्यंत चुरशीचा केला आहे. मंगळवारी (ता. १४) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची वसईत जाहीर सभा झाली. पालघर लोकसभेसाठी मोठी चुरस असताना वसईकरांसाठी आणखी एक सुखद धक्का ठाकरे गटाला मिळत आहे. ठाकरे गटाचे पालघर जिल्हाध्यक्ष पंकज देशमुख यांना कोकण पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारी निश्चित होण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे आता शिवसैनिक पंकज देशमुख यांच्या नावाच्या अधिकृत घोषणेची वाट पाहत आहेत.
बहुजन विकास आघाडीचे नालासोपाऱ्यातील युवा चेहरा असलेले पंकज देशमुख यांनी बहुजन विकास आघाडीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेचे शिवबंधन हाती बांधले. शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यानंतरही पंकज देशमुख यांनी ठाकरे गटासोबतच राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता त्यांच्या पक्षनिष्ठेचे यथोचित बक्षीस म्हणून पालघर जिल्हाध्यक्षपदाची धुरा त्यांच्याकडे सोपवण्यात आली.
जिल्हाध्यक्षपद स्वीकारल्यानंतर त्यांनी सेना वाढवण्यासाठी मोठे प्रयत्न केले. त्यामुळेच देशमुख यांच्या कामाची दखल घेत कोकण पदवीधर मतदारसंघासाठी उद्धव ठाकरे हेही देशमुख यांच्या नावाचा विचार करत आहेत. पक्षाकडून त्यांची उमेदवारी निश्चित झाली असल्याचे संकेत मिळत असून आता फक्त उद्धव ठाकरे यांच्याकडून त्यांच्या नावाची घोषणा होण्याची प्रतीक्षा पालघर जिल्ह्यातील शिवसैनिकांना आहे. पंकज देशमुख यांना उमेदवारी जाहीर झाल्यास या मतदारसंघासाठी पंकज देशमुख हे पहिला युवा चेहरा ठरणार आहेत; तर यावेळी त्यांचा सामना हा भाजपचे कोकण पदवधीर मतदारसंघाचे विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांच्याशी असणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com