मुंबईत ५४३ ज्येष्‍ठ नागरिकांचे गृहमतदान

मुंबईत ५४३ ज्येष्‍ठ नागरिकांचे गृहमतदान

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत प्रथमच ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग मतदार यांना गृहमतदानाची सुविधा उपलब्ध केली आहे. त्यानुसार मुंबई शहर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांत गृह मतदानाला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत ५४३ ज्येष्ठ नागरिक, तर नऊ दिव्यांग मतदारांनी गृहमतदानाद्वारे मतदानाचा हक्क बजावला आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनीही माहिती दिली.
   
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात अर्ज केलेल्या ३१० ज्येष्ठ नागरिक मतदारांनी, तर ९ दिव्यांग मतदारांनी टपाली मतपत्रिकेद्वारे घरून मतदान केले. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात २३३ ज्येष्ठ नागरिक मतदारांनी या सुविधेचा लाभ घेतला. दोन्ही लोकसभा मतदारसंघांत सोमवारपासून (ता. १४) गृहमतदानास प्रारंभ झाला. यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय दोन टीमची नियुक्ती केली आहे. ही टीम मतदारांच्या घरी जाऊन त्यांचे मतदान नोंदवून घेत आहे.
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात ७७३ ज्येष्ठ नागरिक, तर ४८ दिव्यांग मतदारांनी तर दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात ६०४ ज्येष्ठ नागरिक आणि २९ दिव्यांग मतदारांनी गृहमतदानासाठी नोंदणी केली आहे.
------
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचे मतदान
मुंबईतील दोन्ही लोकसभा मतदारसंघांत निवडणूक कर्तव्यावर असलेल्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या टपाली मतदानाला सोमवारपासून (ता. १४) पासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी १,९७४ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी मतदानाचा हक्क बजावला. यात दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात १,३७३ कर्मचारी, तर दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात ६०१ अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी (पोलिस आणि इतर) यांनी टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com