माथेरानच्या राणीला परळ वर्क शॉपमध्ये नवा साज

माथेरानच्या राणीला परळ वर्क शॉपमध्ये नवा साज

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : पर्यटकांचे खास आकर्षण असणारी माथेरानची राणी असलेल्या मिनी ट्रेनला परळ वर्कशॉपमध्ये नवा साज चढविण्यात येत आहे. मिनी ट्रेन लोकोची देखभाल-दुरुस्ती करून आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मिनी ट्रेनच्या इंजिनाचे हुड बदलण्यात आले आहे. साज चढविलेल्या इंजिनाला सोमवारी पर्यटकांच्या सेवेत रुजू करण्यासाठी माथेरानला रवाना करण्यात आल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे.
मुंबई, पुणे आणि परिसरातील नागरिकांसाठी माथेरान हे सर्वात जवळचे आणि सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. नेरळ-माथेरान टॉय ट्रेन ही शंभर वर्षांहून अधिक जुनी आहे. उन्हाळ्यात आणि दिवाळीच्या सुट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक माथेरानला भेट देतात. हे पर्यटक मिनी ट्रेनमधून प्रवास करतात. सध्या मध्य रेल्वे नेरळ-माथेरान-नेरळ दरम्यान दररोज चार सेवा आणि अमन लॉज-माथेरान-अमन लॉज दरम्यान १६ सेवा चालवते. त्यापैकी १२ सेवा दररोज आणि चार विशेष सेवा शनिवार आणि रविवार चालवल्या जात आहेत. या माथेरानचा ट्रेनची नियमितपणे देखभाल-दुरुस्ती करण्यात येते. विशेष म्हणजे इंजिनचे दुरुस्ती परळ वर्कशॉपमध्ये करण्यात येते.

इंजिनचे दोन्ही हुड बदलले
मिनी ट्रेनच्या इंजिनाची दुरुस्ती आणि रंगरंगोटी करण्याचे काम परळ वर्क शॉपमध्ये करण्यात आले. लोकोचे इंजिन दोन्ही हुड काढून नवीन लावण्यात आले आहेत. ट्रान्समिशन एन्क्लोजर एक्स्टेंशनच्या दरवाजांवर सहा हाय स्पीड एक्झॉस्ट पंखे, ध्वनी उत्पादन प्रणालीचा पुरवठा करण्यात आला आहे.
---------
असे आहे इंजिन
वाफेच्या इंजिनावर चालणाऱ्या नेरळ-माथेरान-नेरळ मिनी ट्रेनच्या प्रवासात मागील काही दशकांत मोठे बदल झाले. त्यात वाफेवर चालणारे इंजिन नॅरोगेज ट्रकने प्रवास करताना आगीचे लोळ बाहेर पडून जंगलाचा मोठा ऱ्हास आगी लागून होत होता. त्यामुळे नंतरच्या काळात मिनी ट्रेनची इंजिने डिझेलवर चालू लागली. मिनी ट्रेनच्या ताफ्यात ब्रिटिश काळानंतर एनडीएम ५०० आणि ५५० या श्रेणीमधील काही इंजिने आली. त्यातील पूर्णपणे भारतीय तंत्रज्ञांनी बनविलेले पहिले इंजिन म्हणून एनडीएम १ श्रेणीमधील इंजिन २०१६ पासून येण्यास सुरू झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com