भारतीय स्टार्टप्सना ॲमेझॉन प्रोपेलचे अर्थसहाय्य

भारतीय स्टार्टप्सना ॲमेझॉन प्रोपेलचे अर्थसहाय्य

स्टार्टअप्सना ॲमेझॉन प्रोपेलचे अर्थसाह्य
मुंबई, ता. १५ : ॲमेझॉन प्रोपेलने स्टार्टअपसाठीच्या ग्लोबल बिझनेस एक्‍सेलेटरच्या चौथ्या हंगामाची घोषणा केली. त्याद्वारे यावर्षी जागतिक बाजारपेठांमध्ये ५० भारतीय स्टार्टअप्सना उतरवण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.
या स्टार्टअप्सना पंधरा लाख डॉलरपेक्षा जास्त रकमेची बक्षिसेही मिळतील. तसेच त्यांना ॲमेझॉनकडून एक लाख डॉलर्सचे अनुदान देखील दिले जाईल. भागीदारांकडूनही अर्थसाह्य मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील. अंतिम फेरीतील सर्व स्पर्धकांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उतरवण्यासाठी ॲमेझॉन सर्व ते साह्य पुरवेल.
या मोहिमेत अर्थसाह्य करणारे भागीदार, दळणवळण आणि पेमेंट सेवा पुरवणाऱ्या कंपन्या आणि ॲमेझॉन हे सर्व प्रमुख भागीदार एकत्र येतील. जागतिक ब्रँड म्हणून उतरण्यासाठी स्टार्टअपना योग्य मार्गदर्शन आणि सल्ला देतील. या मोहिमेत आजपासून नऊ जूनपर्यंत अर्ज भरता येतील. शेवटच्या दिवशी प्रेझेंटेशनमध्ये आपापले व्यवसाय प्रस्ताव मांडण्याची आणि व्यवसाय वृद्धीसाठी निधी मिळवण्याची संधी स्टार्टअपना मिळेल.
यात एक मार्गदर्शक मंडळ तयार करण्यात आले असून यात ॲमेझॉन लीडर्स, अर्थसाह्य करणारे भागीदार, उद्योग क्षेत्रातील बड्या व्यक्तिमत्त्वांचा समावेश आहे. ते नव्या स्टार्टअपसोबत संवाद साधतील. जागतिक मागणी आणि ई-कॉमर्स या संदर्भातील चर्चासत्रेही होतील, याबाबतची माहिती ॲमेझॉन इंडियाचे ग्लोबल ट्रेड डायरेक्टर भूपेन वाकणकर यांनी दिली. या मोहिमांद्वारे २०२५ पर्यंत भारतातून होणारी ई-कॉमर्स निर्यात २० अब्ज डॉलरपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू, असेही ते म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com