होर्डिंग हटविण्याच्या कामात अडथळे

होर्डिंग हटविण्याच्या कामात अडथळे

होर्डिंग हटविण्याच्या कामात अडथळे
ज्‍वलनशील पदार्थांच्‍या साठ्याला आग लागण्याची भीती

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ ः घाटकोपर येथील बेकायदा होर्डिंग कोसळून दुर्घटना झालेल्या ठिकाणी कोसळलेल्या होर्डिंगचे सुटे भाग करण्यात येत आहेत. या सुट्या भागांसह राडारोडा हटविण्‍याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे; मात्र घटनास्थळी पेट्रोल पंप असल्याने इंधन, गॅससारख्‍या ज्‍वलनशील पदार्थांच्‍या साठ्यामुळे होर्डिंग हटविण्याच्या कामात अडथळे येत आहेत. आगीसारखी दुर्घटना घडू नये यासाठी विशेष खबरदारी बाळगली जात आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
मुंबई महापालिकेसह मुंबई अग्निशमन दल, मुंबई पोलिस, १०८ रुग्णवाहिका सेवा, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक, भारत पेट्रोलियम, महानगर गॅस आणि इतर सर्व यंत्रणा आपसांत समन्वय राखून कार्यरत आहेत. दरम्‍यान, या दुर्घटनेत १४ जण मृत्‍युमुखी पडले; तर ७४ जखमींना सुखरूपपणे बाहेर काढण्‍यात यश आले आहे. दुर्घटना झालेल्या ठिकाणी कोसळलेल्या फलकाचे प्रारंभी सुटे भाग करण्यात आले. या सुट्या भागांसह राडारोडा हटविण्‍याचे कामदेखील युद्ध पातळीवर सुरू आहे. पेट्रोल पंपाची साठवण क्षमता ४० हजार लिटर पेट्रोल, ३० हजार किलो गॅस आणि ३० हजार लिटर डिझेल इतकी असून या ज्‍वलनशील पदार्थांच्‍या साठ्यामुळे बचाव मोहिमेत काळजीपूर्वक हाताळणी केली जात आहे. त्यामुळे होर्डिंग हटविण्याच्या कामात अडथळे येत आहेत. गॅस कटरने फलकाचे सुटे भाग करताना आगीसारखी दुर्घटना घडू नये यासाठी विशेष मनुष्यबळाच्या साह्याने खबरदारी बाळगली जात आहे.
...
यंत्रणेत समन्वय
मुंबई अग्निशमन दलामार्फत घटनास्थळी १२ फायर इंजिन, २ आरव्‍ही, १ सीपी, १ एचपीएलव्‍ही, १ डब्‍ल्‍यूक्‍यूआरव्‍ही, १ एमएफटी, १०८ आणीबाणी रुग्‍णसाह्य सेवेच्‍या २५ रुग्‍णवाहिका, १ प्रमुख अग्निशमन अधिकारी, २ उपप्रमुख अग्निशमन अधिकारी, ५ वरिष्ठ केंद्र अग्निशमन अधिकारी, ६ केंद्र अग्निशमन अधिकारी तैनात आहेत. पालिकेचे उपायुक्‍त, १ सहायक आयुक्‍त, १ कार्यकारी अभियंता, ३ सहायक अभियंता, १ कनिष्‍ठ अभियंता, २ मुकादम, ७५ कामगारांसह २५ वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक जीवरक्षक उपकरणांसह घटनास्‍थळी तैनात आहेत. १० जेसीबी, १० ट्रक, ५ पोकलेन, २ खासगी गॅस कटरची टीम, २ हायड्रोलिक क्रेन्‍स, २ हायड्रा क्रेन्‍स, ३ वॉटर टॅंकर, मेट्रो व एमएमआरडीएचे ५० कामगार, १० आपदा मित्र असे मनुष्‍यबळदेखील कार्यरत आहे. त्यांच्या मदतीने होर्डिंग हटविण्याचे काम सुरू आहे.
...
जखमींवर उपचार सुरू
दुर्घटनेतील ४२ जखमींवर महापालिकेच्‍या विविध रुग्‍णालयांमध्‍ये उपचार सुरू असून ३२ जखमींवर उपचार करून घरी सोडण्‍यात आले आहे. महापालिकेच्‍या घाटकोपर येथील पालिकेच्या राजावाडी रुग्णालयात ३६ जखमींवर उपचार सुरू असून २५ जखमींना घरी सोडण्‍यात आले आहे. परळ येथील केईएम रुग्‍णालय येथे ५ जखमींवर उपचार सुरू आहेत, तर कळवा येथील प्रकृती रुग्‍णालयात एका जखमीवर उपचार सुरू आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com