डिजिटल होर्डिंगचे आगीने नुकसान

डिजिटल होर्डिंगचे आगीने नुकसान
Published on

ठाणे, ता. २१ : अवकाळी पावसामुळे मुंबईत काही दिवसांपूर्वी होर्डिंग पडून झालेली दुर्घटना ताजी असताना, दुसरीकडे ठाण्यातील रेल्वे स्टेशन परिसरातील एका डिजिटल होर्डिंगला अचानक आग लागल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेत कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही.
मुंबई शहरात घडलेल्या दुर्घटनेनंतर ठाणे शहरातील होर्डिंगचा प्रश्न निर्माण झाला आहे. असे असताना मंगळवारी (ता. २१) सकाळी ७.४५ च्या सुमारास ठाणे स्टेशन परिसरातील रेल्वे फलाट क्रमांक १ जवळ सॅटीस ब्रिजच्या खालील जाहिरातीच्या एका डिजिटल बोर्डच्या इलेक्ट्रिक सॉकेटला अचानक आग लागली. सकाळच्या सत्रातच हा प्रकार घडल्याने प्रवाशांची धांदल उडाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले; पण या प्रकाराने भविष्यात मोठ्या दुर्घटनेची भीती व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com