

Navi Mumbai : उरण रोडवर विरुद्ध दिशेने जाणाऱ्या लेनवरून दुचाकी चालवणे एका तरुणाच्या जीवावर बेतले आहे. सोमवारी रात्री बेलापूर येथे ट्रेलरने दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाचा जागीच मृत्यू झाला असून सीबीडी पोलिसांनी ट्रेलरचालकाला ताब्यात घेतले आहे.
कामोठे येथे राहणारा गौरव शिंदे (२६) तुर्भे येथे कामाला होता. सोमवारी रात्री गौरव दुचाकीवरून कामोठे येथून तुर्भे येथे जात होता. रात्री ११ च्या सुमारास उरण फाटा रोडने तुर्भेच्या दिशेने जात असताना गौरवने आपली दुचाकी विरुद्ध दिशेच्या लेनवर उरणकडे जाणाऱ्या रोडवरून चालवली; पण रेल्वे उड्डाणपुलाच्या सुरुवातीलाच समोरून येणाऱ्या ट्रेलरने दुचाकीला समोरून धडक दिल्याने जखमी गौरवचा घटनास्थळावरच मृत्यू झाला. या प्रकरणी ट्रेलरचालकावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक पराग लोंढे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.