बारावीच्या परिक्षेत शेतमजूरच्या मुलीचे यश

बारावीच्या परिक्षेत शेतमजूरच्या मुलीचे यश

किन्हवली, ता. २३ (बातमीदार) : बारावीच्या निकालात मुलींचेच वर्चस्व दिसून येत आहे. पल्लवी चंद्रकांत उबाळे या विद्यार्थिनीने विज्ञान शाखेत ८६.३३ टक्के गुण मिळवत किन्हवली विभागातून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. पल्लवीचे वडील हे शेतमजूर आहेत.

२०२३ च्या एचएससी बोर्डाच्या निकालात दरवर्षीप्रमाणे मुलींनीच बाजी मारली आहे. किन्हवलीच्या शहा चंदुलाल सरूपचंद विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या विज्ञान व वाणिज्य शाखेचा निकाल शंभर टक्के; तर कला शाखेचा निकाल ९८ टक्के लागला आहे. तिन्ही शाखांमध्ये मुलीच प्रथम क्रमांकावर आहेत. खरिवली (सो) या गावातील गरिबीचे चटके सोसणाऱ्या पल्लवी उबाळे हिने विज्ञान शाखेत ८६.३३ टक्के गुण मिळवत किन्हवली विभागातून प्रथम क्रमांक मिळवला आहे. दहावीच्या परीक्षेतही ९५ टक्के गुण मिळवणाऱ्या पल्लवीची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे.

वडील चंद्रकांत उबाळे व आई कुंदा हातमजुरी व जोडीला दुग्धव्यवसाय करून स्वाभिमानाने आपल्या एकुलत्या एक मुलीचे उच्चशिक्षणाचे स्वप्न साकार करण्यासाठी झटत आहेत. इंजिनिअरिंगचे स्वप्न बाळगणाऱ्या पल्लवीने बारावीच्या परीक्षेत मिळवलेले यश अनेक गरीब विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे आहे. दरम्यान किन्हवलीतील किन्हवलीकर क्लासेस व मुंबईतील सत् करम फाऊंडेशन यांनी पल्लवीच्या पुढील शिक्षणासाठी हातभार लावण्याचे आश्वासन दिले आहे. विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरविंद भानुशाली, सर्व संचालक व मुख्याध्यापक गोपाळ वेखंडे यांनी पल्लवीचे अभिनंदन केले आहे.


शहा विद्यालयात कला शाखेत सानिका तारमळे (८५.८३ टक्के) प्रथम, साधना वेखंडे (८५.१७ टक्के) द्वितीय, पुजा बांगर (८३.५० टक्के) तृतीय क्रमांकने उत्तीर्ण झाल्या आहेत. वाणिज्य शाखेत सायली नामदेव दवणे (८७.६७ टक्के), जागृती यशवंतराव (८१.८३ टक्के) व नेत्रज निमसे (८१ टक्के) अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत. विज्ञान शाखेतही पल्लवी उबाळे, वेदिका पडवळ (८२.३३ टक्के) व हर्षदा तारमळे (८०.६६ टक्के) या तिन्ही मुलीच अव्वल स्थानावर आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com