सदनिका विक्रीत कोट्यवधींची अफरातफरी

सदनिका विक्रीत कोट्यवधींची अफरातफरी

ठाणे, ता. २३ (वार्ताहर) : मोघरपाड्यातील कासारवडवलीतील जागामालकासोबत असलेल्या वादामुळे एसएसएम बिल्डर्सला सदनिका विक्री करण्यास न्यायालयाने बंदी घातली आहे. तरी घरांची विक्री करून मुलुंडच्या आशीष बनसोडे यांच्यासह दोघांची एक कोटी ९५ लाख ६७ हजारांची फसवणूक करणाऱ्या बिल्डर सुरेश म्हात्रे (४९) याला अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक विकास घाेडके यांनी दिली. याप्रकरणी म्हात्रेला दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
एसएसएम डेव्हलपर्सचा मालक सुरेश म्हात्रे याचा कासारवडवलीतील मोघरपाडा येथील जागा मालकासोबत वाद होता. त्यामुळे जागामालकाने दिवाणी न्यायालयात ४ जानेवारी २०१४ रोजी दावा दाखल केला होता. याच दाव्याच्या निकालानुसार म्हात्रे याने जागेवरील सदनिकांची तिसऱ्या व्यक्तीला विक्री करण्यास मनाई आदेश न्यायालयाने दिला होता. तरीही २३ फेब्रुवारी २०१६ ते २१ फेब्रुवारी २०२४ या कालावधीमध्ये मुलुंडचे रहिवासी आशीष बनसोडे (४४) यांच्याकडून ९९ लाख ८४ हजार ९५९ इतकी रक्कम घेतली. तर सचिन महाजन यांच्याकडून ९५ लाख ८२ हजार ७४२ इतकी रक्कम घेतल्याचा आरोप आहे. मुळात, या दोघांचाही म्हात्रे याने विश्वास संपादन करून या दाव्याची बाब त्यांच्यापासून लपवून ठेवत त्यांच्याकडून रक्कम घेतली. अशी या दोघांकडून एक कोटी ९५ लाख ६७ हजारांची रक्कम घेऊन फसवणूक केली. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर बनसोडे यांनी २१ फेब्रुवारीला फसवणुकीसह मोफा कायद्यांतर्गत कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर बिल्डर म्हात्रे याला गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट पाचचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विकास घाेडके यांच्या पथकाने २१ मे रोजी अटक केली. त्यानंतर न्यायालयाने त्याची दोन दिवसांच्या पोलिस कोठडीत रवानगी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com