औद्योगिक क्षेत्रात गृहसंकुलांची घुसखोरी

औद्योगिक क्षेत्रात गृहसंकुलांची घुसखोरी

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २३ ः साठ वर्षांपूर्वी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने डोंबिवली परिसरात औद्योगिक क्षेत्र विकसित केले. त्यावेळी औद्योगिक आणि निवास क्षेत्र यांच्यामध्ये एक संरक्षित पट्टा म्हणून चार ते पाच किलोमीटरचा बफर झोन नियोजनकारांनी एमआयडीसीत प्रस्तावित केला होता; परंतु तत्कालीन काही मंडळींनी अधिकाऱ्यांना हाताशी घेत बफर झोनच गायब केल्याने औद्योगिक क्षेत्रात निवासी संकुलांची घुसखोरी झाली आहे.
एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी अधिकारवाणीने कधीही या भागावर स्वतःचे नियंत्रण ठेवले नाही. त्यामुळे एमआयडीसीचे औद्योगिक विभागासाठी राखीव असलेले ५०० हून अधिक भूखंड आजदे, सागर्ली आणि डोंबिवली शहरातील काही भूमाफियांनी टोलेजंग बेकायदा इमले बांधून हडप केले. या बेकायदा बांधकामांना एमआयडीसीची परवानगी नाही. तसेच तक्रारी आल्यास एमआयडीसीचे अधिकारी फक्त कारवाईच्या नोटिसा देत भूमाफियांशी संगनमत करून या बेकायदा इमल्यांना वेळोवेळी अभय दिले गेले. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रात निवासी संकुले अधिक प्रमाणात दिसत असून कोणत्याही सीमारेषा शिल्लक राहिल्या नसल्याने येत्या काळात काही दुर्घटना घडल्यास त्याची मोठी झळ नागरी वस्तीला बसणार आहे.
------------------------------------
बेकायदा इमल्यांनी जागा हडप
प्रत्येक औद्योगिक पट्ट्याला बफर झोन असतो. डोंबिवली एमआयडीसीत शिळफाटा रस्त्यालगत या झोनची आखणी नियोजनकारांनी केली होती; परंतु काही मंडळींनी मोकळी असलेली जागा बेकायदा इमले बांधून हडप केली. एमआयडीसी निवासी, औद्योगिक विभागाच्या नियोजनाला धक्का लावला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com