सॉफ्टवेअर इंजिनियर लुटारूचा प्राणघातक हल्ला

सॉफ्टवेअर इंजिनियर लुटारूचा प्राणघातक हल्ला

सॉफ्टवेअर इंजिनियरवर लुटारूचा प्राणघातक हल्ला
नवी मुंबई, ता. २९ (वार्ताहर) : जुईनगर रेल्वे स्टेशनजवळून रात्रीच्या सुमारास शॉर्टकट मार्गे सेक्टर-२३ मधील घरी पायी जात असताना सॉफ्टवेअर इंजिनियरवर हल्ला केल्याची घटना सोमवारी (ता. २७) रात्री घडली. शॉर्टकटने घरी जाताना अंधारात लपून बसलेल्या लुटारूने टोकदार वस्तूने त्याच्यावर हल्ला केला. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर नेरूळमधील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. वाशी रेल्वे पोलिसांनी या घटनेतील अज्ञात लुटारूविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.
या घटनेतील जखमी तरुणाचे नाव सुयश खरात (वय २९) असून तो गजानन सोसायटीत आपल्या कुटुंबाबरोबर राहतो. तो तुर्भे येथील कंपनीत कामाला असून सोमवारी सायंकाळी कामावरून घरी जात होता. त्यावेळी रात्री पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास रेल्वे रुळामधून पायी जात होता. त्यावेळी पाठीमागून धावत येऊन त्याच्या पाठीवर टोकदार वस्तूने हल्ला केला. हल्ला केल्यानंतर सुयशने आरडोओरड केल्यानंतर लुटारू नेरूळच्या बाजूने पळून गेला. हल्ला झाल्यानंतर सुयशला डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com