कमी किमतीत सोने खरेदीचे प्रलोभन, महिलेला २८ लाखांचा गंडा
Navi Mumbai Crime:sakal

Navi Mumbai Crime: कमी किमतीत सोने खरेदीचे प्रलोभन, महिलेला २८ लाखांचा गंडा

या प्रकरणातील फरार टोळीतील दोघांना नेरूळ पोलिसांनी बुधवारी (ता. २९) अटक केली.
Published on

Navi mumbai crime: बाजारभावापेक्षा कमी किमतीत अर्धा किलो सोने देण्याचे प्रलोभन दाखवून महिला बँक व्यवस्थापकला तब्बल २७ लाख ८१ हजार रुपयांना लुटल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील फरार टोळीतील दोघांना नेरूळ पोलिसांनी बुधवारी (ता. २९) अटक केली.

राकेश शिवाजी शिंगटे (वय ४२) व रूपेश सुभाष सपकाळे (वय ४२) हे १८ मे रोजी नेरूळमधील डी. वाय. पाटील कॉलेजच्या गेटवरून ही रक्कम घेऊन पसार झाले होते.

 कमी किमतीत सोने खरेदीचे प्रलोभन, महिलेला २८ लाखांचा गंडा
Crime News: खामगाव शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न ऐरणीवर; पोलिसांच्या कार्यक्षमेवर प्रश्‍नचिन्ह

तक्रारदार ३८ वर्षीय महिला कामोठे येथे राहत असून, त्या एका बँकेत व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. राकेश शिंगटे या बँकेच्या खातेदारासोबत त्यांची ओळख झाली होती.

या ओळखीचा फायदा घेत शिंगटे याने बाजारभावापेक्षा कमी किमतीत अर्धा किलो सोने देण्याचे प्रलोभन त्यांना दाखवले. त्या प्रलोभनाला बळी पडून तक्रारदार महिलेने सोने घेण्याची तयारी दर्शवली होती. त्यामुळे महिलेला आरोपी शिंगटे याने १८ मे रोजी २७ लाख ८१ हजार रुपये घेऊन नेरूळ रेल्वे स्टेशनजवळ बोलवले. त्यानंतर डॉ. डी. वाय. पाटील कॉलेजजवळ बोलवले. तिथे शिंगटेसोबत त्याचा मित्र राकेश सपकाळे आला होता.

 कमी किमतीत सोने खरेदीचे प्रलोभन, महिलेला २८ लाखांचा गंडा
Crime News : कोंढावळे खुर्दमध्ये शेतकऱ्याच्या मुलीला जीवंत पुरण्याचा प्रयत्न ;४ जणांविरोधात गुन्हा दाखल

त्यानंतर महिलेला त्यांनी सानपाडा येथे घेऊन जाऊन इतर तिघांनी धमकावून महिलेकडील २७ लाख ८१ हजाराची रोख रक्कम घेऊन पलायन केले. महिला बँक व्यवस्थापकाची लूट केल्यानंतर त्यांनी बुधवारी पैसे लुटणाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर आरोपी राकेश शिंगटे व रूपेश सपकाळे या दोघांना पोलिसांनी अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सचिन ढगे करत आहेत.

 कमी किमतीत सोने खरेदीचे प्रलोभन, महिलेला २८ लाखांचा गंडा
Crime News: खामगाव शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न ऐरणीवर; पोलिसांच्या कार्यक्षमेवर प्रश्‍नचिन्ह

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.