मोटरमन चंद्रशेखर सावंत सेवानिवृत्त

मोटरमन चंद्रशेखर सावंत सेवानिवृत्त

मोटरमन चंद्रशेखर सावंत सेवानिवृत्त
मालाड, ता. १ (बातमीदार) ः पश्चिम रेल्वेचे मोटरमन चंद्रशेखर सावंत हे शुक्रवारी (ता. ३१) निवृत्त झाले. आपल्या ३३ वर्षांच्या सेवेत त्यांना अनेक पुरस्‍कार मिळाले आहेत. ३ जुलै २०१८ रोजी अंधेरीतील गोखले पूल रुळावर घसरला, त्‍यावेळी त्‍यांनी प्रसंगावधान राखत काही सेकंदाआधीच लोकल थांबवली होती, अन्यथा पूल लोकलवर कोसळून मोठी दुर्घटना घडली असती. त्यांना रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी आदर्श मोटरमन पुरस्कार देऊन गौरवले होते. तेव्हा मिळालेल्या पाच लाख रुपयांपैकी त्‍यांनी जवळपास तीन लाख रुपये समाजसेवेसाठी खर्च केले. सध्या ते ‘जॉय ऑफ गीवींग’ या संस्थेचे मुंबई अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. यापुढे संपूर्ण वेळ सामाजिक कार्यासाठी देणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमासाठी त्यांच्यासोबत निवृत्त झालेले बी. एम. मोरे, व्ही. आर. एस. घेतलेले अजित सोनी, नरेश अगरवाल, संजीव मुकुंदन, महेश पार्सेकर, दिनेश मोर्य हे मोटरमन आणि त्यांचे कुटुंबीय उपस्‍थित होते. चर्चगेट येथील कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com