वावराच्या पावरला आई नावाचं कोंदण

वावराच्या पावरला आई नावाचं कोंदण

पनवेल, ता. १ (बातमीदार) : राज्य सरकारने महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. विविध कागदपत्रांमध्ये आईच्या नावाचा समावेश केल्यानंतर आता जमिनीच्या सातबाऱ्यावरदेखील आईचे नाव लागणार आहे. भूमी अभिलेख विभागाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. १ मे २०२४ नंतर जन्मलेल्या व्यक्तीच्या नावे जमीन खरेदीनंतर सातबारा उताऱ्यावर अर्जदारासह आईच्या नावाचा समावेश होणार आहे.
सातबारा उताऱ्यावर आईच्या नावाचा समावेश करण्यासाठी आता संगणक प्रणालीत बदल करण्याची प्रक्रिया भूमी अभिलेख विभागामार्फत सुरू असल्याची माहिती भूमी अभिलेख विभागातील ई-फेरफार प्रकल्पाच्या राज्य संचालक सरिता नरके यांनी दिली. येत्या सहा महिन्यांत त्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे. महिला व बालकल्याण विभागाने काही महिन्यांपूर्वी आईच्या नावाचा समावेश करण्याचा निर्णय घेतला. त्याच भूमी अभिलेख विभागानेही ही सुविधा राबविण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत भूमी अभिलेख विभागातील ई-फेरफार प्रकल्पाच्या राज्य संचालक सरिता नरके म्हणाल्या, १ मे २०२४नंतर जन्माला आलेल्या व्यक्तीचे संपूर्ण रेकॉर्ड तयार व्हायला काही वर्षांचा कालावधी जातो. मात्र, सध्या व्यक्तींच्या नावासोबत आईच्या नावाचा समावेश करण्यासाठी आईच्या नावाचा नवा रकाना तयार करण्यात येणार आहे. त्याबाबत संगणक प्रणालीत तसे बदल करण्यात येणार आहेत. त्या प्रक्रियेला येत्या तीन ते सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे.

------------
तलाठ्यांमार्फत होणार चौकशी
येत्या ६ महिन्यांत जुन्या व्यक्तींच्या नावासोबत आईच्या नावाचा उल्लेख करणे शक्य होणार आहे. त्या व्यक्तीला ती महिला त्याची आई असल्याचा पुरावा द्यावा लागणार आहे. त्यानंतर त्या व्यक्तीच्या नावासोबत आईचे नाव लावले जाईल. त्या संदर्भातील पुरावे तलाठ्यामार्फत शहानिशा केल्यानंतरच नोंद होणार आहे.

-----------
हे पुरावे द्यावे लागतील
सातबारा उताऱ्यावर आईचे नाव लावण्यासाठी त्या व्यक्तीला ती महिला त्याची आई असल्याचा पुरावा द्यावा लागणार आहे. त्यानंतर संबंधित व्यक्तीच्या नावासोबत त्याच्या आईचे नाव लावले जाणार आहे. त्यासंदर्भातील आवश्यक पुरावे दाखल केल्यानंतर त्याची तलाठ्यामार्फत शहानिशा केल्यानंतरच नोंद होईल.

------------
विवाहित स्त्रियांबाबतची पद्धत
विवाहित स्त्रियांच्या बाबतीत सध्या अस्तित्वात असलेल्या पद्धतीनुसार, त्यांच्या विवाहानंतरचे म्हणजेच तिचे नाव, नंतर तिच्या पतीचे नाव आणि आडनाव अशा स्वरूपात नाव नोंदविण्याची प्रक्रिया सुरू ठेवण्यात येणार आहे. तसेच महिलेला विवाहापूर्वीच्या नावाने मालमत्तेच्या दस्तऐवजामध्ये नाव नोंदविण्याची मुभा राहील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com