१६ लाखांचे सोने-हिऱ्याचे दागिने लंपास!
Crime Newssakal

Crime News: १६ लाखांचे सोने-हिऱ्याचे दागिने लंपास!

डॉ. शालिनी पमनानी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात शनिवारी (ता. १) उपचारासाठी गेल्या होत्या.

Ulhasnagar News: तीन दिवसांपूर्वी पहाटेच्या सुमारास सुरक्षारक्षकाने त्याच्या साथीदारांच्या मदतीने कालिमाता मंदिरातील देवीच्या अंगावरील १२ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारला होता. ही घटना ताजी असतानाच उल्हासनगरातील विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दिवसाढवळ्या एका वयोवृद्ध महिला डॉक्टरच्या बंगल्यावर दरोडा टाकण्यात आला.

१६ लाखांचे सोने-हिऱ्याचे दागिने लंपास!
Nashik Crime News : नांदूरनाका परिसराला मद्यपींचा विळखा; अनेक धाब्यांवर सर्रास अवैध दारू विक्री

या दरोडेखोरांनी १६ लाख ७५ हजार रुपयांची रोकड-दागिने लंपास केली असून दोघे जण सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. कॅम्प नंबर ४ मधील फार जुने असलेल्या सतरामदास हॉस्पिटल बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर ७४ वर्षीय डॉ. शालिनी पमनानी यांची मुले परदेशात राहत असल्याने त्या घरात एकट्या राहतात. डॉ. शालिनी पमनानी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात शनिवारी (ता. १) उपचारासाठी गेल्या होत्या.

१६ लाखांचे सोने-हिऱ्याचे दागिने लंपास!
Nashik Crime News : माजी नगरसेवक ॲड. सुनील बोराडे यांच्यावर विहीतगाव येथे जहल्ला! तिघा संशयितांना अटक

सायंकाळी त्या घरी परतल्यावर दरवाजाचा आणि आतील कपाटाचा कडीकोयंडा तोडून त्यातील एक लाख रुपये रोख, सुमारे २५ ते ३० तोळे हिरे-सोन्याचे दागिने असा १६ लाख ७५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे डॉ. शालिनी यांच्या निदर्शनास आले. बंगल्याच्या आत बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोन व्यक्ती सीडीसह इमारतीत सहज प्रवेश करताना कैद झाले आहेत. यातील एकाने डोक्यावर टोपी व तोंडाला रुमाल बांधला आहे.

दोघे पहिल्या मजल्यावर पोहोचून आणि घराचे दोन दरवाजे तोडून आत प्रवेश केल्याचे दिसून येत आहे. या घटनेची माहिती त्यां‍नी विठ्ठलवाडी पोलिसांना दिल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पडवळ यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक प्रवीण खंदारे करत आहेत.

१६ लाखांचे सोने-हिऱ्याचे दागिने लंपास!
Nagpur Crime : चिमुकलीची हत्या करणाऱ्याला तिहेरी फाशी; तिहेरी फाशीचे पहिलेच प्रकरण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com