Nashik Crime News : नांदूरनाका परिसराला मद्यपींचा विळखा; अनेक धाब्यांवर सर्रास अवैध दारू विक्री

Nashik News : नांदूर नाका परिसरात असलेल्या अनेक धाब्यांवर अवैध दारू विक्री व विनापरवाना दारू पिण्यास बसू देण्याच्या प्रकारामुळे या संपूर्ण परिसराला मद्यपींचा विळखा बसू लागला आहे.
Crime
Crime esakal

Nashik News : नांदूर नाका परिसरात असलेल्या अनेक धाब्यांवर अवैध दारू विक्री व विनापरवाना दारू पिण्यास बसू देण्याच्या प्रकारामुळे या संपूर्ण परिसराला मद्यपींचा विळखा बसू लागला आहे. परिसरातील जवळपास ५० हून अधिक धाब्यांमध्ये सर्रासपणे विना परवाना मद्यप्राशन व उघड्यावर दारू पिण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामुळे नांदूर नाका परिसर दारू पिणाऱ्यांसाठी हक्काचं केंद्र बनू लागल्याचे चित्र आहे. (Crime Illegal liquor sale at many dhabas in Nandur Naka)

याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ठोस अशी कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. शहरातील नांदूर नाका परिसर हा महापालिकेचे शेवटचे टोक आहे. त्यानंतर तालुक्याची हद्द सुरु होते. तसेच हा नाशिक- छत्रपती संभाजीनगर महामार्ग असल्याने याठिकाणी मोठ्या प्रमाणात लग्न समारंभासाठी बँक्वेट हॉल व लॉन्स आहे. मात्र आता या परिसराची ओळख हळू हळू मद्यपींचे हक्काचे केंद्र अशी बनू लागली आहे.

रात्री उशिरापर्यंत याठिकाणी मद्य आणि जेवण सहज उपलब्ध होत असल्याने शहरी भागासह आजूबाजूच्या गावातील मद्यपींकडून नांदूरनाका परिसरातील मोठ्या प्रमाणात पसंती मिळू लागली आहे. लग्न समारंभाच्या विशेष करून दाट तिथीच्या कालावधीत येथे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी निर्माण होत असते.

लग्न लागल्यानंतर उत्साही मंडळींची येथील धाब्यांवर जणू काही जत्राच भरते.दारू पिल्यानंतर या सर्व रस्त्यांवर वेगाने वाहने चालवणे, गोंधळ घालणे याचा प्रत्यय वारंवार येत असतो. त्यामुळे याठिकाणी नेहमी अपघात देखील होत असतात. (latest marathi news)

Crime
Nagpur Crime News : ब्रह्मोस क्षेपणास्त्राची माहिती पुरविणाऱ्या निशांतला जन्मठेप

या भागात सर्वाधिक धाबे व हॉटेल

१) जुना आडगाव नाका ते ओढ्या जवळील बंद पडलेला टोल नाका

२) फिल्टरेशन प्लांट ते रासबिहारी चौक

३) आगर टाकळी ते मिरची हॉटेल, अमृतधाम

४) नांदूर नाका ते जत्रा हॉटेल

"सदर परिसर राज्य उत्पादन शुल्कच्या ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात येतो. त्यामुळे याठिकाणी असलेल्या धाबेचालक यांना अवैधरीत्या मद्यविक्री न करण्याबाबत नोटिसा बजावण्यात आलेल्या आहे. जिथे कुठे असे प्रकार घडत असेल तेथे त्वरित कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे." - शशिकांत गर्जे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क

Crime
Sambhaji Nagar Crime : लूटमार करणाऱ्या तरुणीला अटक;पालिका अधिकाऱ्याला मारहाण करीत लांबविला होता ऐवज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com