म्हाडा भूखंडासाठी पुन्हा निविदा

म्हाडा भूखंडासाठी पुन्हा निविदा

मुंबई, ता. १ : मुंबई शहर आणि उपनगरात ठिकठिकाणी असलेल्या भूखंडाच्या विक्रीसाठी म्हाडाने मागवलेल्या निविदांना अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे १६ पैकी १२ भूखंडाच्या विक्रीसाठी फेरनिविदा काढण्याची नामुष्की म्हाडावर ओढवली आहे.
मुंबई महापालिकेने म्हाडाच्या भूखंडावर शाळा, रुग्णालय, खेळाचे मैदान अशा वेगवेगळ्या प्रकारचे आरक्षण टाकले आहे. त्यामुळे त्या ठिकाणी निवासी इमारती उभारणे शक्य नसल्याने ३७५ कोटींच्या १६ भूखंडाची विक्री करण्याचा निर्णय मार्चमध्ये घेण्यात आला होता. मात्र, दोन महिन्यात या निविदा प्रक्रियेला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. १२ भूखंडांना कमी बोली लागल्याने ११ जूनपर्यंत इच्छुकांकडून निविदा मागवल्या आहेत. त्यानुसार तांत्रिक निविदा १२ जून रोजी काढली जाणार आहे, तर अंतिम निविदेची तारीख म्हाडा लवकरच जाहीर करणार आहे. मालाड, मालवणी, चारकोप, विक्रोळी टागोरनगर, कन्नमवार नगर, प्रतीक्षा नगर, ओशिवरा येथील भूखंडाची कमाल किंमत म्हाडाने निश्चित केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com