अकरावी प्रवेशासाठी तीन फेऱ्या
 पहिली गुणवत्ता यादी २६ जून रोजी

अकरावी प्रवेशासाठी तीन फेऱ्या पहिली गुणवत्ता यादी २६ जून रोजी

मुंबई, ता. १ : मुंबई महानगरक्षेत्रासह पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती आणि नागपूर महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाचे वेळापत्रक आज जाहीर करण्यात आले. यानुसार नियमित तीन फेऱ्यांमधील प्रवेशासाठी ५ जूनपासून १६ जूनपर्यंत एकपासून १० महाविद्यालयांचे पसंतीक्रम देता येतील. तर प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी २६ जूनला जाहीर होणार आहे.
प्रवेशफेरीत मिळालेला प्रवेश रद्द करताना विद्यार्थ्यांनी विचारपूर्वक निर्णय घेण्याची सूचना शिक्षण विभागाने केली आहे. संबंधित महाविद्यालयांना विनंती करून विद्यार्थी आपला प्रवेश रद्द करू शकतात. मात्र, प्रवेशफेरीत  पहिल्या पसंतीचे महाविद्यालय अलॉट झाल्यास प्रवेश घेणे बंधनकारक आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याने पहिल्या पसंतीचे महाविद्यालय अलॉट होऊनही प्रवेश घेतला नाही तर पुढील फेरीसाठी बाद होणार आहे.
--
पहिल्या फेरीचे वेळापत्रक
- ५ ते १६ जून - प्रवेश अर्जाचा भाग २ भरणे (जास्तीत जास्त १० महाविद्यालयांचे पर्याय देणे)  कोटा प्रवेशासाठी ऑनलाईन पसंती देणे. नवीन विद्यार्थी नोंदणी करिता येईल. (१५ जूनपर्यंत अर्जाचा भाग १ भरणे)
- १८ जून - प्राथमिक गुणवत्ता यादी जाहीर १८ ते २१ जून - गुणवत्ता यादीवर ऑनलाईन हरकती नोंदविता येणार (ग्रीव्हन्स टूलद्वारे)शिक्षण उपसंचालकांनी हरकतींचे निराकरण करणे (रात्री १० पर्यंत)
- २२ ते २५ जून - पात्र उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करणे
- २६ जून - पहिली गुणवत्ता यादी जाहीर (सकाळी १० वाजता)
- २६ ते २९ जून - प्रवेश निश्चिती, प्रवेश रद्द करणे अथवा नाकारणे. 
- पुढील प्रवेशफेरीसाठी  नवीन नोंदणी, अर्जाचा भाग १ भरणे.
- २९ जून - प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या जाहीर करणे. 
व्यवस्थापन, इनहाऊस कोट्यातील रिक्त जागा जाहीर करणे.
- १ जुलै - नियमित फेरी २ साठी रिक्त जागा जाहीर करणे.
--
 पुढील प्रवेशफेऱ्यांचे वेळापत्रक
२ ते ८ जुलै - नियमित प्रवेशफेरी - २
२९ ते १८ जुलै - नियमित प्रवेशफेरी - ३
१९ ते २६ जुलै - नियमित प्रवेशफेरी - ४
---
कोटा प्रवेशासाठी नोंदणी आवश्यक
- १८ जूनला कोटा प्रवेशाची शून्य फेरी अल्पसंख्याक, इनहाऊस  आणि मॅनेजमेंट या कोटा प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी आवश्यक आहे. व्यवस्थापन कोट्यातील प्रवेश हे महाविद्यालयस्तरावर  पार पडणार आहेत.
- ५ ते १६ जून या कालावधीत विद्यार्थ्यांना कोट्याद्वारे प्रवेशासाठी अर्ज करता येईल. १८ जूनला अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची शून्य फेरी गुणवत्ता यादी महाविद्यालयस्तरावर जाहीर होईल.
- मॅनेजमेंट आणि इनहाऊस कोट्यातील रिक्त जागा नियमित फेऱ्यांसाठी खुल्या होतील. त्यानंतर २२ ते २५ जूनदरम्यान कोटानिहाय रिक्त जागांचा तपशील जाहीर होईल.
- २६ जूनला कोटा प्रवेशाची पहिली फेरी पार पडणार असून २८ जूनपर्यंत  विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी वेळ देण्यात आली आहे. १ जूनला कोट्यातील रिक्त जागा जाहीर होणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com