भायखळा ते सीएसटीएम गाठताना प्रवाशांची दमछाक

भायखळा ते सीएसटीएम गाठताना प्रवाशांची दमछाक

भायखळा ते सीएसएमटी गाठताना प्रवाशांची दमछाक
‘बेस्ट’साठी लांबच लांब रांगा, उकाड्यामुळेही मुंबईकर हैराण

मुंबई, ता. १ : मध्य रेल्वेच्या जम्बो मेगा ब्लॉकमुळे नियमित नोकरी आणि व्यवसायासाठी मुंबई गाठणाऱ्या प्रवाशांना प्रचंड हाल सहन करावे लागले. शनिवार असल्याने मुंबई महापालिका आणि राज्य सरकारी कार्यालये तसेच केंद्रीय आस्थापना बंद असल्यामुळे प्रवाशांची गर्दी कमी होती, मात्र खासगी कंपन्यांतील कर्मचाऱ्यांची नियमित उपस्थिती होती.
शनिवारी सर्व लोकल गाड्या भायखळ्यापर्यंत होत्या. त्यामुळे भायखळा स्टेशन ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, फोर्ट, कुलाबा, कफ परेड अशी बेस्ट बसची सेवा उपलब्ध होती. मात्र, प्रवासी वाढल्यामुळे बससाठी रांगा लागल्या होत्या. त्यातच गरमीच्या त्रासानेही मुंबईकर प्रचंड हैराण झाले होते.
चुनाभट्टीला राहणाऱ्या परमेश्वर यांचे कार्यालय कफ परेड येथे आहे. त्यांना कामावर पोहोचण्यासाठी आज टॅक्सीने प्रवास करावा लागला. तर परतीच्या प्रवासासाठी बेस्ट पकडण्यासाठी तासभराचा अवधी लागला. लोकल सुरू ठेवल्या असत्या तर प्रवाशांचे हाल कमी झाले असते, असे मत परमेश्वर यांनी मांडले.

कोट्स
कल्याणवरून मुलांना गेट वे ऑफ इंडिया आणि मरिन ड्राईव्ह समुद्रकिनारा पाहायचा होता, म्हणून आलो होतो. मात्र, उन्हामुळे प्रचंड त्रास झाला.
-नूतन राऊत, प्रवासी
........
मी खासगी कार्यालयात काम करतो. शनिवारी सुटी नसते, म्हणून कामावर यावे लागले. कल्याण ते भायखळा आणि तेथून बेस्ट बसने वरळीला आलो. दररोजच्या प्रवासामुळे मला विशेष फरक जाणवला नाही.
-सुमित तांबे, प्रवासी
...
टिटवाळा येथून भायखळा, भायखळा येथून सीएसएमटीवर आलो. मात्र, बसस्थानकावर बस उशिरा येत आहेत. प्रवासी संख्या वाढल्यामुळे बेस्टमधून उभ्याने प्रवास करावा लागला.
-श्याम सावंत, प्रवासी
...
डोंबिवलीवरून मुंबईला आलो. सीएसएमटीवरून भायखळा स्टेशन गाठण्यासाठी बसची वाट पाहावी लागली. त्यामुळे मेगा ब्लॉक महत्त्वाचा आहे. मात्र, दुसऱ्या शनिवारी हे काम घेतले असते तर प्रवाशांचे हाल कमी झाले असते.
-संजय काळजे, डोंबिवली
...
तुरळक गर्दी
मेट्रो सिनेमा चौक, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, सेल्फी पॉईंट्स, हुतात्मा चौक आदी नियमित लोकांच्या गर्दीने फुललेला भाग आज मेगाब्लॉक आणि सरकारी कार्यालयांना सुटी असल्यामुळे सुना सुना दिसत होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com