बेकायदेशीरपणे वापरलेले ड्रोन जप्त

बेकायदेशीरपणे वापरलेले ड्रोन जप्त

बेकायदेशीरपणे वापरलेले ड्रोन जप्त
धारावी प्रीमियम लिगदरम्‍यान कारवाई
धारावी, ता. १ (बातमीदार) : मुंबई पोलिसांनी ‘अदाणी’च्या धारावी प्रीमियर लीगदरम्यान धारावीमध्ये बेकायदेशीरपणे वापरलेले ड्रोन शनिवारी (ता. १) जप्त केले. आयोजकांकडे ड्रोन वापरण्याची परवानगी नव्हती, असे तपासात समोर आले आहे.
डीसीपी तेजस्वी सातपुते (झोन ५) यांनी अधिकाऱ्यांना ड्रोन जप्त करण्याचे आणि कार्यक्रमाचे आयोजक असलेल्या ‘डीआरपीपीएल’वर एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे शाहूनगर पोलिस ठाण्याचे तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक उमेश विचारे यांनी दखलपात्र गुन्हा क्रमांक १८३/ २०३४ कलम १८८ ड्रोन रोल २०२१ प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे. धारावी बचाव आंदोलनाचे समन्वयक सदस्य संजय रमेश भालेराव यांनी डीपीएलला ‘एजंट’ तयार करण्याचा प्रयत्न म्हटले आहे. भालेराव म्‍हणाले की, अदाणी समूहाने आपल्या पैशांच्या सामर्थ्याने धारावीतील तरुणांना आकर्षित करण्यासाठी या धारावी प्रीमियर लीग (डीपीएल)चे आयोजन केले आहे. हेच मॉडेल राजकीय नेते वापरतात. परिसरातील विविध संस्थांना पैसे वाटून त्या मनुष्यबळाचा वापर आपल्या राजकीय फायद्यासाठी करतात.

तरुणांना आकर्षित करण्याचा प्रयत्‍न
‘डीपीएल’च्या माध्यमातून अदाणी समूह या भागातील तरुण घटकांशी संबंध प्रस्थापित करेल आणि त्यांचे एजंटमध्ये रूपांतर करेल. धारावीवासीय त्यांना साथ देत असल्याचे चित्र त्यांना मांडायचे आहे, पण काही काळानंतर ते या तरुणांचा वापर करून त्यांना जबरदस्तीने हुसकावून लावतील, असे धारावी बचाव आंदोलनाचे समन्वयक सदस्य संजय रमेश भालेराव म्‍हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com