मुलुंडमध्ये सुरक्षारक्षकाला मारहाण

मुलुंडमध्ये सुरक्षारक्षकाला मारहाण

मुलुंडमध्ये सुरक्षा रक्षकाला मारहाण
मुलुंड, ता. ५ (बातमीदार) ः मुलुंड पश्चिमेतील एका बांधकाम साईटवर कर्तव्यावर असलेल्या सुनील सिंह या सुरक्षा रक्षकाला याच भागातील काही समाजकंटकांनी क्षुल्लक कारणावरून बेदम मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली. सुनील सिंह हा नेहमीप्रमाणे गोशाळा रोड मुलुंड पश्चिम येथील एका बांधकाम साईटवर कर्तव्यावर होता. सुनील हा खुर्चीवर बसला असताना तिथे आरोपी आले. बाहेर बसण्यासाठी आम्हाला खुर्ची हवी आहे, असे सांगितले. त्यावेळी सुनील सिंहने नकार दिला. त्‍यानंतर दोघांनी सुनीलला धमकावले. शिवीगाळ करत सुनीलच्या तोंडावर व कानावर मारहाण केली. त्यानंतर त्यांचे इतर दोन साथीदार आले व त्यांनीही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दुसरा सुरक्षा रक्षक मदतीसाठी आला असता त्‍यालाही धमकावण्यात आले. जखमी सुनीलला उपचारासाठी मुलुंड पश्‍चिमेतील अगरवाल रुग्‍णालयात दाखल करण्यात आले. त्‍यानंतर सुरक्षा रक्षकाने मुलुंड पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com