एनडीएला अंदाजापेक्षा अधिक जागा मिळणार ः आठवले

एनडीएला अंदाजापेक्षा अधिक जागा मिळणार ः आठवले

एनडीएला अंदाजापेक्षा अधिक जागा मिळणार ः आठवले

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ ः देशभरातील विविध एक्झिट पोल हे एनडीएला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचे सांगत आहेत; मात्र एक्झिट पोलच्या अंदाजापेक्षा एनडीएला जास्त जागा मिळतील. महाराष्ट्रात महायुतीला ३५ ते ४० जागा मिळतील, असा विश्‍वास रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे.
मागील वर्षात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत राजस्थानमध्ये भाजपचे सरकार येणार आणि मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपला यश मिळणार नाही, असा अंदाज एक्झिट पोलने दिला होता. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीबाबत एक्झिट पोलचे जे अंदाज होते, त्यापेक्षा अधिक मोठे यश भाजपला मिळाले होते. त्यामुळे एक्झिट पोलपेक्षा अधिक मोठे यश मिळविण्याची भाजपची परंपरा यावेळी कायम राहणार आहे. प्रत्यक्ष निकालात एनडीए चारशेपेक्षा अधिक जागा जिंकेल, असा आशावाद रामदास आठवले यांनी व्यक्त केला.
...
महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीत ‘काँटे की टक्कर’ आहे; मात्र हा सामना महायुतीच जिंकणार आहे. राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १८ सभा घेतल्या. त्यामुळे राज्यात किमान ३५ ते ४० जागा महायुतीला मिळतील.
- रामदास आठवले, रिपाइं नेते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com