महाराष्ट्रातील युवक अनुभवणार स्काय डायव्हिंगचा थरार

महाराष्ट्रातील युवक अनुभवणार स्काय डायव्हिंगचा थरार

कल्याण, ता. २ (वार्ताहर) : ठाणे जिल्ह्यात टिटवाळा येथील विनायक मार्शल आर्ट्स आणि फिटनेस झोनचे तीन साहसी क्रीडा प्रशिक्षक विनायक कोळी, हरीष वायदंडे आणि गणेश गायकवाड यांची स्काय डायव्हिंगच्या प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. येत्या ४ जून रोजी ते स्काय डायव्हिंग प्रशिक्षणासाठी परदेशी रवाना होणार आहेत. या प्रशिक्षणासाठी ते वर्षभरापासून तयारी करत आहेत. यातून अडव्हान्स‍ हाय रोप कोर्स क्लिफ जम्प, बंजी जम्प अशा विविध प्रकारच्या प्रशिक्षणातून मानसिक आणि शारीरिक क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत.
स्काय डायव्हिंग हा सर्व साहसी खेळातील अति उच्च साहसी क्रीडा प्रकार आहे. विमानातून १५ हजार फूट उंचीवरून पॅराशूटच्या साह्याने उडी मारून सुरक्षित जमिनीवर उतरणे, हे या खेळाचे मुख्य उद्दिष्ट आहे. विमानातून उडी मारल्यानंतर पॅराशूट उघडेपर्यंत किमान १५० ते २०० मीटर प्रति तास इतक्या वेगाने आपण जमिनीकडे येऊ लागतो. त्याचप्रमाणे ३जी इतका गुरुत्वाकर्षणाच्या अवरोधाचा सामना करावा लागतो. या सर्व बाबींचा विचार करून संपूर्ण प्रशिक्षण घेऊन स्काय डायव्हिंग करणारे निवडक लोक या खेळाचा अनुभव प्राप्त करू शकतात. नियमित व्यायाम आणि मानसिक स्वास्थ यांच्या जोरावर टिटवाळा येथील हे क्रीडा प्रशिक्षक साहसी खेळातील सर्वांत जास्त चित्तथरारक समजल्या जाणाऱ्या उपक्रमात सहभागी होणार आहेत. या सर्वांच्या जिद्दीला यथोचित यश मिळावे, अशी अपेक्षा समस्त टिटवाळावासीयांच्या वतीने व्यक्त केली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com