‘प्रॅक्टस’चे मूल्यांकन एक अब्ज डॉलर करण्याचे ध्येय

‘प्रॅक्टस’चे मूल्यांकन एक अब्ज डॉलर करण्याचे ध्येय

‘प्रॅक्टस’चे मूल्यांकन एक अब्ज डॉलर करण्याचे ध्येय
मुंबई, ता. २ ः तोट्यात किंवा यथातथा चालत असलेला एखाद्या कंपनीचा व्यवसाय कसा वाढवावा, कंपनी नफ्यात कशी आणावी, खर्च कसे कमी करावे, याचा सल्ला देणाऱ्या ‘कन्सल्टिंग फर्म प्रॅक्टस’ने २०३० पर्यंत आपले मूल्यांकन एक अब्ज डॉलर एवढे करण्याचे ध्येय ठेवले आहे.
कंपनीचे पार्टनर (परफॉर्मन्स इम्प्रुव्हमेंट) अमेय वायंगणकर यांनी ही माहिती ‘सकाळ’ला दिली. प्रॅक्टसतर्फे औषध निर्मिती कंपन्या, ई-कॉमर्स कंपन्या, निर्मिती क्षेत्रातील कंपन्या, दळणवळण, रिटेलिंग आदी कंपन्यांना व्यवसायवाढीचा सल्ला दिला जातो. परदेशातील कंपन्यांनाही सल्ला दिला जातो. त्यासाठी अमेरिकेतही त्यांचे कार्यालय आहे, तर आखाती देशातही त्यांचे क्लायंट आहेत. भारतात मुंबई, बंगलोर, दिल्ली, अहमदाबाद, बडोदा, हैदराबाद आदी शहरात प्रॅक्टसची कामे असतात.
एखाद्या कंपनीला तीन वर्षांत आपला मोठा विस्तार करायचा असल्यास त्याचा आराखडा केला जातो. त्यानंतर त्याची अंमलबजावणी आणि प्रत्यक्ष कार्यचालन याबाबतही सल्ला दिला जातो. या क्षेत्रातील मोठ्या कंपन्या, छोट्या कंपन्या आणि मध्यम कंपन्या यांच्या गरजा वेगवेगळ्या असतात, असेही ते म्हणाले.
कामगारांचे कौशल्य कसे वाढवावे, तंत्रज्ञान आधुनिक कसे करावे, खेळते भांडवल वाढवणे, उत्पादनात वाढ कशी करावी, तंत्रज्ञान किंवा डिजिटल क्षेत्रातील कंपनीला पाच वर्षांत विकास कसा होईल, दोन कंपन्यांचे विलीनीकरण झाल्यानंतर उद्दिष्ट साध्य कसे करावे, याबाबत सल्‍ला दिला जातो, असे वायंगणकर म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com