कोकणातील लोककला प्रकारांवर परिसंवाद

कोकणातील लोककला प्रकारांवर परिसंवाद

कोकणातील लोककला प्रकारांवर परिसंवाद
मुलुंड, ता. ५ (बातमीदार) ः संस्कारभारती कोकण प्रांत आणि लोकायन सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक आणि बहुउद्देशीय संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने, कोकणातील प्रयोगात्मक लोककलांचा ऑनलाईन परिसंवाद शनिवार (ता. ८), रविवार (ता. ९) दरम्‍यान सायंकाळी ७ ते ९ या कालावधीत आयोजित केला आहे. या परिसंवादात भरतमुनी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ लोककलाकार गणपत सखाराम मसगे हे ठाकर लोककला प्रकारात कळसूत्री बाहुल्या, चित्रकथी, चामड्याच्या बाहुल्या, कळबाहुली, पोवाडा, फुगडी, डोना गीत, पांगुळ बैल, गोंधळ, पोत, राधानृत्य, पिंगळी या बारा लोककला प्रकारांवर प्रकाश टाकणार आहेत; तर शंकर मेस्त्री दशावतार नाट्यप्रकार आणि प्रा. डॉ. सूर्यकांत आजगावकर हे नमन खेळे या प्रकारावर मार्गदर्शन करतील. हा परिसंवाद सर्वांसाठी विनामूल्य असून नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी ८८५०३८५१२९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com