अमूलचे दूध दोन रुपयांनी महाग

अमूलचे दूध दोन रुपयांनी महाग

अमूलचे दूध दोन रुपयांनी महाग

मुंबई, ता. ३ : अमूल दुधाच्या दरात लिटरमागे दोन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने अमूल गोल्ड, अमूल शक्ती आणि अमूल फ्रेश या उत्पादनात दरवाढ केल्याची माहिती दिली. सोमवारपासून (ता.३) या नव्या दूध दराची अंमलबजावणी करण्यात आली आहे. फेडरेशनने रविवारी (ता. २) एक परिपत्र जारी करत याबाबत माहिती दिली. कामकाज आणि उत्पादन खर्च वाढल्याने दुधाचे दर वाढवले ​​जात आहेत. दोन रुपये प्रति लिटर वाढ म्हणजे कमाल किरकोळ किंमत (एमआरपी) ही तीन ते चार टक्क्यांनी वाढेल. असे या पत्रात नमुद करण्यात आले आहे. इनपुट कॉस्ट वाढ झाल्यामुळे आमच्या सभासद संघटनांनी शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या दुधाच्या दरात गेल्या वर्षीच्या तुलनेत ६ ते ८ टक्क्यांनी वाढ केली आहे. ग्राहकांनी दिलेल्या प्रत्येक रुपयापैकी अमूल ८० पैसे दूध उत्पादकांना देत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com