रस्ते कामातील दिंरगाई भोवणार

रस्ते कामातील दिंरगाई भोवणार

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ ः मुंबईतील रस्ते सात जूनपूर्वी वाहतूक योग्य झालेच पाहिजेत, अन्यथा दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदाराऐवजी दुसरा कंत्राटदार नेमून अर्धवट कामे पूर्ण केली जातील, अशी तंबी पालिकेने कंत्राटदारांना दिली आहे.
मुंबईत सध्या सुरू असलेली रस्त्यांची कामे संबंधित कंत्राटदारांनी वेळेत पूर्ण करावीत, यासाठी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर यांनी कठोर कारवाईचा निर्णय घेतला आहे. तसेच ७ जूनपूर्वी सर्व रस्ते वाहतूक योग्य करण्याचे आदेश देताना अपूर्ण कामांचा खर्च मूळ कंत्राटदाराकडून वसूल करण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबईत सुरू असलेल्या कामांसाठी ही कार्यपद्धती लागू असेल, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.
--------------------------------------------
आयुक्तांची कठोर भूमिका
मुंबईतील अर्धवट राहिलेल्या रस्ते कामांबाबत पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी कठोर निर्णय घेतले आहेत. रस्ते वाहतूक योग्य करावेत, पावसाळ्यात कोणत्याही रस्त्याचे काम सुरू ठेवून नागरिकांची गैरसोय करू नये, असे आदेश त्यांनी दिले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com