मेधा पाटकर यांची फेरनिवड

मेधा पाटकर यांची फेरनिवड

‘श्रमिक जनता’च्या अध्यक्षपदी मेधा पाटकर यांची फेरनिवड

ठाणे शहर, ता. ३ (बातमीदार) ः श्रमिक जनता संघ युनियनची ५८वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (ता. २) ठाणे जिल्ह्यात कल्याण येथे पार पडली. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांची युनियनच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली.
या वेळी राष्ट्रीय महासचिव पदावर सामाजिक कार्यकर्ते जगदीश खैरालिया, उपाध्यक्षपदी डॉ. संजय मंगला गोपाळ, खजिनदार म्हणून अविनाश नाईक, सहखजिनदार पदावर सुदर्शन साहू, सचिवपदावर सुनील कंद आणि संजय चौहान यांची पुढील काळासाठी सर्वानुमते निवड करण्यात आली. कार्यकारी समिती सदस्य म्हणून अर्चना पवार, अनिता कुमावत, गणेश चव्हाण, संतोष देशमुख, बापू ओव्हाळ, सूरज वाल्मीकी, गौतम सहानी, पूजा पंडित, रोशन गायकर, सुखेंदु मडैया, दुर्गेश खवसे, राजकुमार दुबे, रामसुशील विश्वकर्मा, संतोष गुप्ता, बैजनाथ यादव, कृपाशंकर मिश्रा, चंद्रकांत चौधरी, वीरेंद्र सावंत, नवीन मिश्रा आदी आणि कार्यालयीन सचिव म्हणून अजय भोसले यांची निवड करण्यात आली. सरकारने चार लेबर कोड रद्द करून सर्व कामगार कायदे पुन्हा अमलात आणावे, मैला सफाईचे काम यांत्रिक पद्धतीने करावे, कायम नोकरी द्यावी, समान कामाला समान वेतन अदा करावे, असे ठरावही मंजूर करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com