मतमोजणीसाठी रस्ते वाहतुकीत बदल

मतमोजणीसाठी रस्ते वाहतुकीत बदल

सकाळ वृत्तसेवा 
मुंबई, ता. ३ : मुंबईत सहा लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी आज होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्ते वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. यामध्ये काही ठिकाणी रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. तर काही ठिकाणी अवजड वाहतूक निर्बंध, नो पार्किंग केली गेली आहे. 
मुंबई शहर जिल्ह्यातील मुंबई दक्षिण व मुंबई दक्षिण मध्य या दोन्ही लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी मंगळवारी (ता. ४) सकाळी आठ वाजल्यापासून मुंबईतील शिवडी येथील वेअर हाऊस, गाडी अड्डा येथे सुरू होणार आहे.  मुंबई उपनगर जिल्ह्यातील मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, आणि मुंबई उत्तर मध्य या लोकसभा मतदारसंघांची मतमोजणी नेस्को सेंटर, गोरेगाव येथे, तर मुंबई उत्तर पूर्व या मतदारसंघाची मतमोजणी उदयांचल शाळा, विक्रोळी येथे होणार  आहे. प्रत्यक्ष मतमोजणीस सकाळी आठ वाजता सुरुवात होणार असल्याने शहरातील काही मार्गांवर सर्व वाहनांस पार्कींग करण्यास मनाई करण्यात आली आहे. तर काही ठिकाणी पर्यायी वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
------------------------------------ 
बंद असलेले मार्ग
- मुंबई उपनगरातील एकूण तीन मतदारसंघांची मतमोजणी केंद्र नेस्को प्रदर्शन सेंटर येथे  होणार आहे. त्यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्ग, उत्तर वाहिनी, सर्व्हिस रोड जयकोच जंक्शन ते नेस्को गॅप जंक्शनपर्यंतच्या महामार्गावर दोन्ही वाहिनीवर सर्व प्रकारच्या वाहनांना (निवडणूक व मतमोजणीच्या अनुषंगाने व त्यासाठीचे अधिकारी व कर्मचारी यांची वाहने वगळून) सकाळी पाचपासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत निर्बंध आहेत.
- मुंबई उत्तर पूर्व या मतदारसंघाची मतमोजणी उदयांचल शाळा, विक्रोळी येथे होणार आहे. त्यामुळे आम्रपाली ते विक्रोळी गावठाण या मार्गावर अत्यावश्यक सेवा वगळता इतर वाहने पार्किंग करण्यास पहाटे पाच ते दुपारी १२ या वेळेत मनाई असणार आहे. गावठाण परिसरातील नागरिकांना ये-जा करण्यास मुभा असणार आहे.
------------------------
वाहनासाठीचे पर्यायी मार्ग
- जयकोच जंक्शन पश्चिम द्रुतगती महामार्ग, उत्तर वाहिनी सर्व्हिस रोडने नेस्को गॅपकडे जाणाऱ्या वाहनांना जयकोच जंक्शन स्लिप रोडने नेस्को गॅप डावे वळण घेऊन इच्छित स्थळी जातील. तसेच मृणालताई गोरे जंक्शनकडून जयकोच जंक्शनकडे येणारे वाहतुकीकरिता मृणालताई गोरे जंक्शन उजवे वळण घेऊन मृणालताई गोरे ब्रीजच्यावर यूटर्न घेऊन दक्षिण वाहिनीने महानंदा जंक्शन ते स्लिप रोडने जयकोच जंक्शन पुढे इच्छित स्थळी जातील.
- गाडी अड्डा जंक्शन ते शिवडी वेअर हाऊस स्ट्रॉंग रूम मेनगेट शिवडी पूर्व मुंबई आणि शिवडी वेअर हाऊस स्ट्रॉंग रूम मेनगेट ते रेतीबंदरकडे जाणारा रोड शिवडी पूर्व मुंबई या रस्त्यांचा समावेश आहे. तर इंदिरा नगर हे बंदर रोडपासून पुढे एलबीएस कॉलेजकडे जाणारा रोड शिवडी पूर्व येथे वाहने पार्किंग करण्यास उपलब्ध असणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com