एसटीचे मालवाहतुकीकडे दुर्लक्ष

एसटीचे मालवाहतुकीकडे दुर्लक्ष

एसटीचे मालवाहतुकीकडे दुर्लक्ष 
मासिक उत्पन्न एक कोटीहून २५ लाखांवर 
सकाळ वृत्तसेवा 
मुंबई, ता ३ : एसटी महामंडळाने उत्पन्नाचा एक पर्याय म्हणून मालवाहतूक सुरू केली. त्यातून अल्प खर्चात एसटीला चांगले उत्पन्न मिळत होते. मात्र आता एसटी महामंडळाचे मालवाहतुकीकडे दुर्लक्ष झाले असून त्यामुळे मासिक उत्पन्नात ७५ टक्क्यांची घट झाली आहे.  
गेल्या काही दिवसांत नादुरुस्त वाहने बंद करण्यात आल्यामुळे गाड्यांची संख्या कमी झाली आहे. पूर्वी ११०० एसटीद्वारे मालवाहतूक करण्यात येत होती. मात्र, सध्या ही संख्या ८०० वर आली आहे. त्यामुळे प्रवाशांना अल्प दरात उपलब्ध होणारी एसटीची सुविधा अपुरी पडत आहे. कोरोना काळात सर्व वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या एसटी महामंडळाने उत्पन्न वाढविण्यासाठी १ मे २०२० रोजी मालवाहतूक सेवा सुरू केली. त्यासाठी गाड्यांमध्ये अंशतः बदल करून माल वाहतुकीसाठी लागणारे वाहन तयार करण्यात आले. या सेवेचे ‘महाकार्गो’ असे नामकरण करण्यात आले. सुरक्षित आणि स्वस्त दरात मिळणाऱ्या सेवेमुळे नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत होता. या सेवेतून एसटीला महिन्याला कोट्यवधींचे उत्पन्न मिळत होते; परंतु मालवाहतुकीसाठी वापरण्यात आलेली वाहने भंगारात निघाल्याने या सेवेतील वाहने कमी झाली आहेत. परिणामी, मालवाहतुकीसाठी गाड्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे.


..
सुरक्षित आणि वाजवी दर
कोरोना काळात प्रवासी सेवा बंद असताना एसटीची मालवाहतूक सेवा सुरू होती. वाजवी दर, खात्रीशीर सेवा आणि सुरक्षिततेमुळे या सेवेला खासगी आणि सरकारी कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत होता. या मालवाहतूक बसद्वारे एकेरी भाडे आकारले जाते. १ ते २०० किमी दरम्‍यान ५७ रुपये, तर २०० किमी पुढील अंतर असल्‍यास ५५ रुपये भाडे आकारले जात आहे. हे सर्वसामान्‍य नागरिकांना परवडणारे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com