शांतीलाल मोदी मार्गाचे संथगती काम

शांतीलाल मोदी मार्गाचे संथगती काम

शांतीलाल मोदी मार्गाचे संथगती काम
कांदिवली, ता. ४ (बातमीदार) ः कांदिवली पश्चिमेला शांतीलाल मोदी मार्गासह पदपथाची दुरवस्था झाली आहे. पदपथ, गटाराचे अपुरे काम करून तसेच सोडण्यात आले आहे. त्‍यामुळे नागरिकांना पदपथाऐवजी रस्‍त्‍यावरून चालावे लागत आहे. रस्‍त्‍यालगत पडलेले पाईप, उंच सखलपणा यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. अपघाताची भीती नागरिकांना सतावत आहे. पालिका अधिकाऱ्यांनी तकलादू कामांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. शांतीलाल मोदी मार्गावर शाळा, महाविद्यालये दवाखाना आणि रेशनिंग कार्यालय आहे. त्‍यामुळे या परिसरात वाहनांसह नागरिकांची सतत वर्दळ असते. पालिकेच्या अधिकाऱ्यांचा ठेकेदारावर वचक राहिला नसल्‍याने ही परिस्‍थिती उद्‌भवली आहे, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते प्रमोद घाग यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com