‘रोटरी’चा मोतीबिंदू मुक्त प्रकल्‍प

‘रोटरी’चा मोतीबिंदू मुक्त प्रकल्‍प

‘रोटरी’चा मोतीबिंदूमुक्त प्रकल्‍प
२३ महिन्यांत ६५० हून अधिक शस्त्रक्रिया
मुलुंड, ता. ४ (बातमीदार) ः रोटरी क्लब ऑफ भांडुपने ऑगस्‍ट २०२२ पासून मोतीबिंदूमुक्त प्रकल्‍पांतर्गत ६५० हून अधिक शस्‍त्रक्रिया केल्‍या. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी मोतीबिंदू तपासणी आणि नेत्र तपासणी शिबिरे आयोजित केली जातात.
विशेष म्हणजे रुग्णांना शस्त्रक्रिया, रुग्‍णालयामधील मुक्काम आणि वाहतूक खर्च दिला जातो. आतापर्यंत रोटरी क्लबच्या २३ शिबिरांमध्ये जवळपास १५०० लोकांची तपासणी करण्यात आली. ६५० हून अधिक शस्त्रक्रिया, जवळपास १०० लोकांना चष्मेही मोफत दिले आहेत. भक्तिवेदांत हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, मीरा रोड आणि बिल्लावरा असोसिएशन, भांडुप यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवला जात आहे. सुरुवातीला भांडुप येथील बिल्लावारा असोसिएशनच्या आवारात शिबिराचे आयोजन केले जायचे. आता दत्त मंदिर, हॉटेल गोपालाश्रमाजवळ, वागळे इस्टेट, ठाणे येथे शिबिरे घेतली जात आहेत. भक्तिवेदांत हॉस्पिटलमधील डॉक्टर, कर्मचाऱ्यांद्वारे लाभार्थ्यांची मोबाइल व्हॅनमध्ये तपासणी केली जाते. मोतीबिंदू असलेल्यांना शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला जातो. त्यांना भक्तिवेदांत हॉस्पिटलमधून त्यांच्या वाहनाने मीरा रोड येथील हॉस्पिटलमध्ये नेले जाते. ऑपरेशन करून दोन दिवसांनी घरी सोडले जाते.
रोटरी क्लबच्या या उपक्रमाचे यश साजरे करण्यासाठी नुकतेच ठाण्यामध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. एजीसी वर्ल्डचे सुनील कुमार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विजय जाधव, दत्त मंदिराचे विश्वस्त, हॉटेल गोपालाश्रमचे मालक राघव शेट्टी, रोटरी क्लब ऑफ भांडुपकडून अध्यक्ष जेनिफर आयझॅक, रोटरी क्लब ऑफ मुलुंडचे अध्यक्ष हितेश गणात्रा उपस्थित होते. पीपी नटराजन यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. प्रमुख पाहुणे सुनील कुमार यांनी रोटरी क्लब ऑफ भांडुपच्या सदस्यांचे निस्वार्थ सेवा केल्याबद्दल कौतुक केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com