दोन खासदारांची हॅट्रीक हुकली

दोन खासदारांची हॅट्रीक हुकली

संसदेत नवीन चेहऱ्यांना संधी
सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. ४ : हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असलेल्या ठाण्यातील तीनपैकी दोन खासदारांचे तिसऱ्यांदा निवडून येण्याचे स्वप्न भंगले आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान खासदार राजन विचारे आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघातील भाजपचे विद्यमान खासदार कपिल पाटील यांना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यांच्या जागी आता ठाण्यातून शिवसेना शिंदे गटाचे नरेश म्हस्के आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सुरेश ऊर्फ बाळ्यामामा म्हात्रे हे दोन नवीन चेहरे पहिल्यांदा संसदेत जाणार आहेत. दरम्यान कल्याणचे विद्यमान खासदार आणि शिवसेना शिंदे गटाचे डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मात्र सलग तिसऱ्यांदा निवडून येण्याची हॅट्रिक साधली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी मंगळवारी (ता. ४ ) पार पडली. जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत यंदा ७९ एकूण उमेदवारांपैकी तीन उमेदवार हे विद्यमान खासदार होते. २०१४ पासून सलग निवडून येणाऱ्या या खासदारांना २०२४ मध्येही विजयाची हॅट्रिक साधण्याचे वेध लागले होते; मात्र अडीच वर्षांपूर्वी बदललेल्या राजकीय समीकरणामुळे यंदाची निवडणूक ही चुरशीची ठरली होती. ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत असली, तरी खरी लढाई ही शिवसेना ठाकरे गट विरुद्ध शिवसेना शिंदे गट अशीच होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा या लढती होत्या; तर ठाणे जिल्ह्यात ठाकरे गटासाठी ही अस्तित्वाची लढाई होती. यामध्ये शिवसेना शिंदे गटाने बाजी मारली असून ठाण्यातील ठाकरे गटाचे विद्यमान खासदार राजन विचारे यांना घरचा रस्ता दाखवला आहे.

कल्याणमध्ये डॉ. श्रीकांत शिंदे यांना तिसऱ्यांदा विजयी करत आपली सरशी केली आहे. भिवंडी मतदारसंघात मात्र भाजपचे कमळ कोमजले आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाची तुतारीचा आवाज भिवंडीत गुंजल्यामुळे केंद्रीय राज्यमंत्रिपदापर्यंत मजल मारलेल्या कपिल पाटील यांना आता घरी बसावे लागणार आहे. त्यामुळे ठाण्यातील तीनपैकी दोन खासदारांच्या विजयाची हॅट्रिक हुकली असून त्यांना पराजयाचा सामना करावा लागला आहे. त्यांच्याऐवजी आता नरेश म्हस्के आणि सुरेश ऊर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांना संसदेत जाण्याची संधी मिळाली आहे.

ठाणे लोकसभा मतदारसंघ
राजन विचारे यांना मिळालेली मते व नोटा
२०२४
एकूण मतदान- १३,०६,१९४ (५२.०९)
राजन विचारे-
नोटा-
बहुमत-

२०१९
एकूण मतदान- ११७०५१८ (४८ टक्के)
राजन विचारे- ७४०९६९ (६३.३ टक्के) २८.०९
नोटा- २०४२६ (१.७५ टक्के)
बहुमत- ४१२१४५ (३५.२१)

२०१४
एकूण मतदान- १०५४१८९ (५०.८५)
राजन विचारे- ५८५३६४ (५७.१९ टक्के) ३०.१८
नोटा- १३१७४ (०.६४)
बहुमत- २८१२९९ (२७.०१)

कल्याण लोकसभा मतदारसंघ
डॉ. श्रीकांत शिंदे

२०२४
एकूण मतदान-१०४३६१० (५०.१२)
डॉ. श्रीकांत शिंदे- ४४९४७४
नोटा -
बहूमत -२१६१०८

२०१९
एकूण मतदान- ८९०६९२ (४५.३१)
डॉ. श्रीकांत शिंदे- ५५९७२३ (६२.८७)
नोटा- १३०१२ (१.४६)
बहूमत - ४४३४३ (३८.६८)

२०१४
एकूण मतदान- ८२५४१४ (४२.९४)
डॉ. श्रीकांत शिंदे- ४४०८९२ (५३.४९)
नोटा- ९१८५ (१.११)
बहूमत - २५०७४९ (३०.४२)

२०१४
एकूण मतदान- ८२५४१४ (४२.९४)
डॉ. श्रीकांत शिंदे- ४४०८९२ (५३.४९)
नोटा- ९१८५ (१.११)
बहूमत - २५०७४९ (३०.४२)

भिवंडी लोकसभा मतदारसंघ
कपिल पाटील
२०२४
एकूण मतदान- १२५००७६ (५९.८९)
कपिल पाटील- ३,३६,४२४ (३३.९७)
नोटा- ७२९३

२०१९
एकूण मतदान- १००५६०५ (५३.२०)
कपिल पाटील- ५२३५८३ (५२.०९)
नोटा- १६३९८ (१.६३)
बहूमत- १५६३२९ (१५.५५)

२०१४
एकूण मतदान- ८७५८०४ (५१.६२)
कपिल पाटील- ४११०७० (४६.९५)
नोटा-
बहुमत- १०९४५० (१२.५०)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com