पालघरमध्ये महायुतीच्या राम मंदिर, विकास पॅटर्नची घोडदौड

पालघरमध्ये महायुतीच्या राम मंदिर, विकास पॅटर्नची घोडदौड

पालघरमध्ये महायुतीच्या राम मंदिर, विकास पॅटर्नची घोडदौड
वसई, ता. ४ (बातमीदार) : पालघर लोकसभेत डॉ. हेमंत सावरा यांनी विजयश्री खेचून आणली. त्यांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा प्रचार दौरा कामी आला. त्यांनी राम मंदिरापासून ते अगदी विकासाच्या बाबतीतले मुद्दे हाती घेतले व त्याचा परिणाम मतमोजणी दरम्यान पाहावयास मिळाला. याठिकाणी मतदारांनी महायुतीला कौल दिला.

महाविकास आघाडीने सर्वात प्रथम उमेदवार म्हणून भारती कामडी यांची उमेदवारी जाहीर केली. त्यांनी आपल्या प्रचारात वाढवण बंदर विरोध, स्थानिक विकासाचे मुद्दे यावर भर दिला. याठिकाणी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे व अन्य नेतेमंडळींनी प्रचारात उडी घेतली, परंतु त्याला फारसे यश आले नाही. कामडी यांना दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. दुसरीकडे स्वबळावर निवडून येणार, आमचा विजय नक्की होणार, असा एल्गार बहुजन विकास आघाडीने केला, मात्र त्यांचे उमेदवार राजेश पाटील मोठ्या फरकाने पराभूत झाले. वसई, नालासोपारा व बोईसर हा विधानसभा मतदारसंघ ठाकुरांचा बाल्लेकिल्ला असला तरी बहुजन विकास आघाडीला यश खेचून आणता आले नाही.

पालघर लोकसभा निवडणुकीत महिला मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान केले. मतदानाच्या दिवशी अनेक केंद्रांवर महिलांच्या रांगा होत्या. त्यानंतर मतदारांनी कोणत्या उमेदवाराला कौल दिला हे गुलदस्त्यात होते, परंतु मतमोजणीत महायुतीचे डॉ. हेमंत सावरा यांना मतदारांनी पसंती दिल्याचे दिसून आले. निकाल लागताच महायुतीने जल्लोष सुरू केला. यामध्ये फटाक्यांची आतिषबाजी, मिठाईचे वाटप करत सावरा यांना उचलून जल्लोष करण्यात आला. या निवडणुकीत महायुतीने धार्मिक मुद्यांना हात घालत राम मंदिराचा मुद्दा पुढे केला. सोबतच विकासाला देखील प्राधान्य दिल्यामुळे हा विजय सावरा यांना खेचून आणता आला.

...
एकूण मतदान : १३,७३,१५९

भारती कामडी : ४,१६,८२२
डॉ. हेमंत सावरा : ६,००,२०८
राजेश पाटील : २,५४,०११

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com