चिंता, धाकधुक आणि जल्लोष

चिंता, धाकधुक आणि जल्लोष

चिंता, धाकधुक आणि जल्लोष
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता.४) मतमोजणीच्या दिवशी चिंता, धाकधुक आणि जल्लोष असेच काहीसे वातावरण होते. मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे, तर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये निराशा होती; मात्र दुपारनंतर महाविकास आघाडीच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनी जोरदार पुनरागमन करत उज्ज्वल निकम यांचे मताधिक्य मोडून काढत आघाडी घेतली; मात्र सातत्याने दोन्ही उमेदवारांचे मताधिक्य कमीजास्त होत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये चिंता, धाकधुक असेच वातावरण होते; मात्र सायंकाळी गायकवाड यांना विजयी घोषित केल्याने कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. उज्ज्वल निकम यांना सकाळपासून मताधिक्य असल्याने भर उन्हात पश्‍चिम द्रुतगती मार्गावर महानंद डेअरीसमोर जल्लोष करणारे भाजपचे कार्यकर्ते अचानक गायब झाले, तर त्यांची जागा काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेत जल्लोष केला. हेच चित्र वांद्रे पूर्व, वांद्रे पश्‍चिम, कुर्ला, कलीना, धारावी परिसरातही होते, तर भाजपच्या गोटात सन्नाटा पसरला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com