मुंबईतील विजयाला काँग्रेस-राष्ट्रवादीची झालर

मुंबईतील विजयाला काँग्रेस-राष्ट्रवादीची झालर

मुंबईतील विजयाला काँग्रेस-राष्ट्रवादीची झालर
ठाकरे गटाला मोठी मदत, मलिकांची साथ गायकवाडांना

मुंबई, ता. ४ : मुंबईत लोकसभेच्या सहा जागांसाठी अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस (शरद पवार गट) यांचा महत्त्वाचा वाटा आहे. मुंबईतील दोन्ही पक्षांचे आमदार आणि माजी नगरसेवकांना आघाडीच्या विजयात महत्त्वाची भूमिका राहिली आहे. कुठेही मतांचे विभाजन होवू न देता आघाडीची वज्रमूठ एक राहिली आहे.

दक्षिण मुंबईतून शिवसेना ठाकरे गटाचे अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबई अनिल देसाई, ईशान्य मुंबईतून संजय दिना पाटील, उत्तर मध्य काँग्रेसच्या वर्षा गायकवाड हे विजयी झाले आहेत. कॉँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांनी मालाड विधानसभा मतदारसंघातून कॉँग्रेसचे आमदार भूषण पाटील यांच्या विजयासाठी आटोकाट प्रयत्न केले; मात्र भाजप उमेदवार पियूष गोयल यांच्यापुढे ते टिकू शकले नाहीत.
आमदार झिशान सिद्धिकी यांनी वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या अमोल कीर्तिकर यांच्या मागे उभा करण्यासाठी मोठी ताकद लावली; पण त्यांनाही निसटता पराभव सहन करावा लागला. कॉँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांना राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची चांगली साथ लाभली. कुर्ला भागातून मुस्लिम मते आघाडीकडे वळविण्यात त्याचा मोठा वाटा राहिला आहे. वर्षा गायकवाड यांच्या विजयासाठी नवाब मलिक यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे या निकालावरून दिसून येते.

कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस तसेच शिवसेना आमदारांची साथ आघाडीच्या उमेदवारांना मिळाली. त्यामुळे आघाडीच्या उमेदवारांचा विजय सुकर झाला. मुंबईतील आघाडीच्या घटक पक्षांच्या माजी नगरसेवकांची मोठी ताकद या निवडणुकीत दिसून आली. त्याचे परिणाम निकालातून दिसल्यामुळेच आघाडीच्या उमेदवारांचा विजय सोपा झाला.

मुंबईत कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट आणि आघाडीतील घटक पक्षांच्या एकजुटीचे बळ मिळाले. त्यात लोकांनीही निवडणूक हातात घेतली होती.
----------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com