सेनाभवनात जल्लोष अन् शिवालयात शांतता

सेनाभवनात जल्लोष अन् शिवालयात शांतता

सेनाभवनात जल्लोष अन् शिवालयात शांतता 
शिंदे गटाचा जल्लोष, ठाकरे गटावर बोचरी टीका

सकाळ वृत्तसेवा 
मुंबई, ता. ४ : लोकसभा निवडणुकीचे निकाल मंगळवारी (ता. ४) जाहीर झाले. मुंबईत शिवसेना ठाकरे गटाचे चार तर शिंदे गटाचा एकही उमेदवार निवडून आला नाही. मात्र, नरिमन पॉईंट येथील  बाळासाहेब भवन येथे  शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आणि एकमेकांना पेढा भरवून जल्लोष साजरा केला. ठाकरे गटाचे मुंबईत सर्व उमेदवार आले असले तरी सर्व शिवसैनिक सेनाभवन आणि मातोश्री येथे गेल्याने शिवालय येथे शांतता होती. 
राज्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला  १० आणि शिंदे गटाला सहा जागा मिळाल्या आहेत. 
शिवसेना शिंदे गट सचिव संदीप मोरे यांनी सांगितले की, ‘‘आम्हाला राज्यात सहा जागा मिळाल्या आहेत, आम्ही समाधानी आहोत.  इतरांना (ठाकरे गट) ज्या जागा मिळाल्या आहेत त्याचा ते आनंद साजरा करत आहेत; परंतु त्यांनी त्यासाठी कशी जुळवाजुळव केली हे सर्वांना माहीत आहे. ते  जिंकण्यासाठी ते काहीही करू शकतात.  आम्ही का हरलो  ते जगाला माहीत आहे... ते जिंकण्याची नशा घेत आहेत; पण परिणाम  त्यांच्या पुढच्या पिढीला  त्यांच्या मुलाबाळांना भोगावे लागतील. लोकसभेला त्यांचे जास्त उमेदवार आले असले तरी हेच गणित विधानसभेला लागू असणार नाही. ऑक्टोबरमध्ये होणारी विधानसभा जिंकून आम्ही दिवाळी साजरी करू, ती दिवाळी आमची असेल.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com