मिरा-भाईंदरच्या पाणीपुरवठ्यात १० एमएलडीची वाढ

मिरा-भाईंदरच्या पाणीपुरवठ्यात १० एमएलडीची वाढ

भाईंदर, ता. ५ (बातमीदार) : मिरा-भाईंदर शहराला भेडसावत असलेली पाणी समस्या लक्षात घेऊन मिरा-भाईंदरच्या पाणीपुरवठ्यात १० दशलक्ष लिटरची (एमएलडी) वाढ करण्याचे आदेश उद्योगमंत्री उदय सामंत यांनी एमआयडीसीला दिले आहेत. हे पाणी उद्या (ता. ६)पासून मिळणार असल्याची माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली.

मिरा-भाईंदर शहराला एमआयडीसीकडून १२५ दशलक्ष लिटर पाणी मंजूर आहे; परंतु प्रत्यक्षात ११५ दशलक्ष लिटर पाणीच एमआयडीसीकडून मिळते. एमआयडीसीने पूर्ण १२५ दशलक्ष लिटर पाणी द्यावे, यासाठी लोकप्रतिनिधींकडून वारंवार मागणी होत आहे; मात्र काटई नाक ते शिळफाटा या दरम्यानच्या जलवाहिनीचे काम अपूर्ण, त्याचप्रमाणे बारवी जलशुद्धीकरण केंद्रातील काही कामे बाकी असल्याने पूर्ण क्षमतेने पाणी देणे शक्य नसल्याचे एमआयडीसीकडून गेली काही वर्षे सातत्याने सांगण्यात येत आहे.

मिरा-भाईंदर शहराची लोकसंख्या सातत्याने वाढत आहे. शहराची मागणी व पुरवठा यातील अंतर वाढू लागले आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी समस्या भेडसावू लागली आहे. शहरासाठी लवकरच सूर्या धरण पाणी योजनेतून २१८ दशलक्ष पाणी मिळणार आहे; मात्र त्याला अद्याप तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे नागरिकांना सद्यःस्थितीत भेडसावत असलेल्या पाणी समस्येतून दिलासा देण्यासाठी एमआयडीसीच्या पाणीपुरवठ्यात १० दशलक्ष लिटरची वाढ तातडीने करण्यात यावी, अशी मागणी सरनाईक यांनी उद्योगमंत्री सामंत यांच्याकडे केली होती.

उद्यापासून पाणी मिळणार
सरनाईक यांनी मागणीसंदर्भात सामंत यांची भेटदेखील घेतली होती. त्यानंतर उद्योगमंत्र्यांनी एमआयडीसीचे मुख्य अभियंता प्रकाश चव्हाण यांना मिरा-भाईंदरला सूर्या धरणातून जोपर्यंत पाणीपुरवठा सुरू होत नाही, तोपर्यंत १० दशलक्ष लिटर पाणी तातडीने देण्याचे आदेश दिले, अशी माहिती सरनाईक यांनी दिली. या वाढीव पाण्यामुळे मिरा-भाईंदरच्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com