माथेरान घाट अपघातातील जखमी व्यक्तीचा मृत्यू

माथेरान घाट अपघातातील जखमी व्यक्तीचा मृत्यू

माथेरान घाट अपघातातील जखमी व्यक्तीचा मृत्यू
महिलेच्या पायावर शस्त्रक्रिया

नेरळ, ता. ५ (बातमीदार) ः माथेरान घाटरस्त्यात २ जूनला स्कुटीला अपघात होऊन पती-पत्नी व त्यांची एक वर्षांची मुलगी यांचा अपघात झाला होता. या अपघातातील पती-पत्नीवर उपचार सुरू होते; मात्र उपचारादरम्यान पतीचा मृत्यू झाला.
बदलापूर गोरेगाव येथे राहणारा मुबतसीम दानिश बुबेरे हा पत्नी नमरा बुबेरे आणि एका वर्षाच्या मुलीला माथेरान फिरण्यासाठी म्हणून स्कूटीवरून रविवारी (ता. २) सकाळी आला होता. फिरून झाल्यानंतर हे कुटुंब सायंकाळी घरी निघाले असता माथेरान घाटातील जुम्मापट्टी येथील अवघड वळणावर बुबेरे यांच्या वाहनाला रात्री सात वाजण्याच्या सुमारास अपघात घडला. या वेळी मुबतसीम याच्या डोक्याला आणि पत्नी नमरा हिच्या पायाला जबर मार लागला होता. मुबतसीम याला पनवेल एमजीएम रुग्णालयात अधिक उपचारासाठी हलवण्यात आले होते, तर पत्नी नमरा हीस बदलापूर मॅट्रिक्स रुग्णालय येथे उपचार सुरू होते. एकवर्षीय चिमुकली ही सुखरूप बचावल्याने तिला कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आले होते. मुबतसीम याला गंभीर इजा झाली होती. त्यामुळे तो मृत्यूशी झुंजत होता. अखेर दुसऱ्या दिवशी मंगळवार (ता. ४) एमजीएम रुग्णालयात मुबतसीम याची झुंज असफल ठरली, तर त्याच्या पतीच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. माथेरान येथील अवघड समजल्या जाणाऱ्या एस वळणावर याअगोदरदेखील अपघात घडून अनेकांनी आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे परिवहन विभागाने येथे अपघात न होण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी वाहनचालकांमधून जोर धरत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com