पर्यावरणीय सोयीसुविधांसाठी पालिका कटिबद्ध

पर्यावरणीय सोयीसुविधांसाठी पालिका कटिबद्ध

पर्यावरणीय सोयी-सुविधांसाठी पालिका कटिबद्ध
अश्विनी जोशी ः मुंबईत वातावरणीय अर्थसंकल्प अहवालाचे प्रकाशन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : पर्यावरणाप्रती जागरुक राहणे ही प्रत्येकाची जबाबदारी असून नागरी संस्था या नात्याने पालिकासुद्धा या जबाबदारीप्रती अत्यंत संवेदनशील आहे. वातावरण बदलाशी संबंधित पॅरिस कराराच्या अनुषंगाने पर्यावरणाशी सुसंगत राहून विविध पायाभूत सोयी-सुविधांची निर्मिती करणे महत्त्वाचे आहे. वातावरणीय अर्थसंकल्पाच्या माध्यमातून पालिकेने त्या दिशेने प्रभावीपणे पुढाकार घेतला असल्याचा उद्गार अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांनी काढले.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पालिकेच्या वतीने पहिला ‘वातावरणीय अर्थसंकल्प अहवाल’ प्रकाशित करण्यात आला. मुंबईतील वातावरणीय बदलाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी प्रशासन प्रणाली बळकट करण्याच्या दिशेने महापालिकेच्या वतीने अहवालाच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांच्या हस्ते ५ जून रोजी अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाला उपायुक्त मिनेश पिंपळे, संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
पालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या, मलनिस्सारण प्रकल्प, मलनस्सारण प्रचालन, मुंबई मलनिस्सारण प्रकल्प, पाणीपुरवठा प्रकल्प आणि घनकचरा व्यवस्थापन खात्यांचा पर्यावरणाशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे संबंध येतो. या विभागांमार्फत हाती घेतले जाणारे प्रकल्प किंवा राबविल्या जाणाऱ्या पर्यावरणपूरक उपक्रमांना प्रोत्साहन आणि प्राधान्य देणे, हा या वातावरणीय अर्थसंकल्पामागे प्रमुख उद्देश असल्याचे जोशी यांनी सांगितले.
...........
आराखड्यामध्ये वातावरणविषयक लक्ष्य निश्चित
मुंबई वातावरण कृती आराखड्यामध्ये (एमकॅप) वातावरणविषयक लक्ष्य निश्चित केले आहे. या लक्ष्यांचा महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पीय प्रक्रियेमध्ये समावेश होतो, हे या वातावरणीय अर्थसंकल्प अहवालात समाविष्ट करण्यात आले आहे. यामध्ये मुंबई वातावरण कृती आराखड्याशी संबंधित असलेल्या क्षेत्रांमधील प्रकल्पांचे नियोजन आणि अंमलबजावणी, धोरणे तसेच मार्गदर्शक तत्त्वांमध्ये वातावरणस्नेही उपाययोजनांचा अवलंब करणे या बाबींचा समावेश आहे.
..........

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com