सलग तिसऱ्या प्रवाशांचा खोंळबा

सलग तिसऱ्या प्रवाशांचा खोंळबा

सलग तिसऱ्या दिवशी प्रवाशांचा खोळंबा
मुंबईकरांची फरपट; मध्य रेल्वेकडून दिलगिरी
-
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : सीएसएमटी स्थानकात बसवण्यात आलेली इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग यंत्रणा सलग तिसऱ्या दिवशी स्थिर न झाल्यामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले. ३६ तासांच्या ब्लॉकनंतरही मध्य रेल्वेची उपनगरीय लोकल सेवा सलग तीन दिवसांपासून विलंबाने धावत असल्याने प्रवाशांनी रेल्वेच्या कारभारावर संताप व्यक्त केला. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या विभागीय व्यस्थापकांकडून आपल्या ‘एक्स’ अकाऊंटवरून लोकल विलंबामुळे प्रवाशांना होणाऱ्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करण्यात आली.

सीएसएमटी स्थानकातील फलाट क्रमांक १० व ११ च्या विस्तारीकरणासाठी १ जूनच्या मध्यरात्रीपासून मेगाब्लॉक घेण्यात आला. हा मेगाब्लॉक नियोजित वेळेनुसार रविवारी दुपारी संपला. यावेळी सीएसएमटी यार्डमध्ये नवीन इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग यंत्रणा बसविण्यात आली; परंतु नव्या यंत्रणेमुळे लोकल सेवा रुळावर न आल्याने गेल्या तीन दिवसांपासून प्रवाशांचे हाल सुरू आहेत. बुधवारी (ता. ५) परळ ते सीएसएमटीदरम्यान लोकल सेवा धीम्या गतीने धावत असल्याने लोकल सेवांचे वेळापत्रक कोलमडले. याचा सर्वाधिक फटका सीएसएमटीकडे येणाऱ्या धीम्या लोकलला बसला आहे. त्यामुळे लोकल सेवा १० ते १५ मिनिटे विलंबाने धावत असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. नवीन यंत्रणा असल्याने सिग्नल यंत्रणा स्थिर होण्यासाठी आणि यंत्रणेत असलेले काही दोष आणि अडचणी दूर करण्यासाठी मध्य रेल्वेकडून गेल्या तीन दिवसांपासून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, सिग्नल यंत्रणा स्थिर करण्यात मध्य रेल्वेला यश आले नाही. येत्या एक-दोन दिवसांत सिग्नल यंत्रणा स्थिर होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

..
लोकल एकामागोमाग उभ्या
गेल्या तीन दिवसांपासून मध्य रेल्वेच्या जलद आणि धीम्या मार्गावरील लोकल विलंबाने धावत आहेत. बुधवारी करी रोड ते सीएसएमटी दरम्यान लोकलचा वेग अत्यंत कमी झाल्याने गाड्या एकामागोमाग एक उभ्या होत्या. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहे. यामुळे मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या विभागीय व्यस्थापकांकडून आपल्या अधिकृत ‘एक्स’ अकाऊंटवरून लोकल विलंबामुळे प्रवाशांना होणाऱ्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com