- वंदे भारत ट्रेनच्या १८हजार ४२३ फेऱ्या !

- वंदे भारत ट्रेनच्या १८हजार ४२३ फेऱ्या !

‘वंदे भारत’च्या
१८,४२३ फेऱ्या
देशभरात प्रवाशांचा भरभरून प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : देशभरात आरामदायी प्रवासासाठी ‘वंदे भारत’ ट्रेनला प्रवाशांची चांगली पसंती मिळत आहे. सध्या विविध मार्गांवर १०२ गाड्या धावत असून आतापर्यंत १८ हजार ४२३ फेऱ्या झाल्या असून लाखो प्रवाशांनी प्रवास केला आहे. ‘वंदे भारत’ची प्रवासी क्षमताही वाढली आहे.
प्रवाशांना वेगवान आणि सोयीसुविधांयुक्त आरामदायी प्रवास करता यावा, यासाठी भारतीय रेल्वेने ‘वंदे भारत’ ट्रेन सुरू केली आहे. राज्यात सीएसएमटी ते मडगाव, शिर्डी, सोलापूर, जालना, इंदूर आणि नागपूर ते बिलासपूरदरम्यान सात ट्रेन चालवल्या जात आहेत.
-----
१०५.७ टक्के प्रवाशांची वाहतूक
देशात ‘वंदे भारत’मधून क्षमतेच्या तुलनेत १०५.७ टक्के प्रवासी (ऑक्युपेन्सी) प्रवास करत आहेत. केरळ राज्यात सर्वाधिक १७५ टक्के ऑक्युपेन्सी आहे. या ट्रेनला पुरुषांची ६१ टक्के, तर महिलांची ३८ टक्के पसंती आहे. झारखंड राज्यात पुरुषांची सर्वाधिक ६७ टक्के, तर गोवा राज्यात महिलांची सर्वाधिक ४२ टक्के पसंती मिळत आहे.
२६ ते ४५ वयोगटातील ४६ टक्के प्रवासी ‘वंदे भारत’ला पसंती देत आहेत. केरळ राज्यात १५.७ टक्के ज्येष्ठ नागरिक प्रवास करतात.
---
-
आतापर्यंत १.२४ कोटी किमी धावली
देशात ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस सुरू झाल्यापासून एक कोटी २४ लाख ८७ हजार ५४० किलोमीटर अंतर पार केले आहे. २३ एप्रिल ते २४ मार्चपर्यंत ९७ लाख ७१ हजार ७०५ किलोमीटर अंतर कापले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com