वीज ग्राहकांनी पावसाळ्यात काळजी घ्या

वीज ग्राहकांनी पावसाळ्यात काळजी घ्या

वीज ग्राहकांनी पावसाळ्यात ‘बेस्ट’चे आवाहन
२४ तास फ्युज कंट्रोल कार्यरत; अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नेमणूक

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : पावसाळ्यामध्ये विद्युतपुरवठा खंडित होण्याचे तसेच विजेचा धक्का बसून अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा समस्यांचा सामना करण्यासाठी बेस्ट उपक्रमाने प्रतिबंधात्मक उपाय केले आहेत. ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी बेस्ट प्रशासनकडून जागोजागी अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे.

पावसाळ्यामध्ये अनेक ठिकाणी पाणी साठणे व वाहतुकीची कोंडी होऊन खंडित झालेला विद्युतपुरवठा सुरळीत करण्यासाठी यांची मदत घेतली जाणार आहे. या उपक्रमाला ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही केले आहे. ग्राहकांच्या तक्रारीच्या निवारणार्थ बेस्ट उपक्रमातर्फे आठवड्याच्या सर्व दिवशी २४ तास फ्युज कंट्रोल कार्यरत आहेत. तक्रार नोंदवताना वीजग्राहकांनी त्यांचा वीजग्राहक क्रमांक अथवा वीजमापक क्रमांक नोंदवावा. फ्युज कंट्रोल दूरध्वनी क्रमांक छापलेले आहेत. तक्रार नोंदविताना या दोनपैकी एक क्रमांक आपल्या जवळ असणे अपेक्षित आहे. वीज ग्राहक त्यांच्या वीजपुरवठ्याबाबतच्या तक्रारी ''MiBest'' या ॲपवर नोंदवू शकतात. सदरचे ॲप वीज ग्राहक त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर गुगल प्ले स्टोअर आणि ॲपल ॲप स्टोअरवरून डाऊनलोड करू शकतात. पावसाळ्यामध्ये विजेचा धक्का बसू नये अथवा इतर अपघात घडू नयेत, यासाठी बेस्ट उपक्रमाने दर्शवल्याप्रमाणे ''काय करावे'' व ''काय करू नये'' यासंबंधी मार्गदर्शक सूचनांचे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

........................
वीजग्राहकांनो हे करा
१. पावसाच्या पाण्यापासून वीजमापक केबिन जमिनीपासून उंचावर बांधा
२. वायरिंग तसेच घरातील विद्युत उपकरणांचे वायरिंग तपासून घ्या
३. अतिवृष्टी वेळी पाणी गळू लागल्यास घरातील विजेचे मुख्य स्वीच बंद करा.
४. ठिणग्या पडत असतील, विजेचा धक्का बसत असेल, तर संबंधित विभागाशी संपर्क साधा
................................

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com