जव्हारमध्ये ढगाळ वातावरणामुळे उकाडा

जव्हारमध्ये ढगाळ वातावरणामुळे उकाडा

जव्हार, ता. ६ (बातमीदार) : थंड हवेचे ठिकाण ते मिनी महाबळेश्वर ओळख असलेल्या जव्हार तालुक्यात बेसुमार जंगलतोड, वणवे यामुळे वातावरणाचा समतोल ढासळत आहे. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून सकाळपासूनच ढगाळ वातावरण असल्याने तापमानात वाढ होत आहे. परिणामी शहरात ३८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून उकाडा वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

कडक उन्हाळ्याने हैराण झालेल्या जव्हारवासीयांना आता जून उजाडल्यानंतर मॉन्सूनच्या आगमनाची आस लागून आहे. त्यातच शहर परिसरात कोकिळेचा आवाज घुमू लागल्याने लवकरच पावसाच्या सरी बरसून वातावरणातील दाहकता कमी होईल, अशी अपेक्षादेखील आहे. दरम्यान, गेल्या पाच दिवसांपासून शहरात दिवसा ढगाळ वातावरण राहत आहे. गुरुवारी (ता. ६) पहाटे ४ वाजता हलक्या स्वरूपाच्या सरी बरसल्या असल्या तरी उकाडा काही कमी झालेला वाटत नाही.

गेल्या दोन दिवसांपूर्वी तालुक्यात किमान तापमान २४.७ अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान ३६.८ अंश सेल्सिअस नोंदविले आहे. ढगाळ वातावरण असल्याने येत्या काही दिवसांतच पावसाचा आनंद घेता येईल, अशी ज्येष्ठ नागरिकांना अपेक्षा आहे. सायंकाळी सात वाजता हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविला होता. पालघर, नाशिकसह पुणे, अहमदनगर, धाराशिव, लातूर, सोलापूर येथे तीन ते चार तासांमध्ये हवेचा वेग ताशी ४० ते ५० किलोमीटरपर्यंत पोहोचेल. काही ठिकाणी पावसाचा शिडकावा होण्याची शक्यता वर्तविली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com