चार आमदारांनी गड राखले

चार आमदारांनी गड राखले

चार आमदारांनी गड राखले
यामिनी जाधव, आदित्य ठाकरेंना धोक्याचा इशारा
मुंबई, ता. ६ : दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. सहापैकी यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अरविंद सावंत यांनी यामिनी जाधव यांच्या भायखळ्यासह मुंबादेवी, वरळी, शिवडी या चार मतदारसंघांत आघाडी घेतली; तर शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांना मलबार हिल आणि कुलाबा या दोन मतदारसंघात आघाडी घेता आली आहे. मात्र मुस्लिमबहुल मुंबादेवी आणि दलित, मुस्लिमबहुल भायखळा मतदारसंघातून निर्णायक आघाडी घेतल्याने सावंत यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला. दुसरीकडे यामिनी जाधव यांना मलबार हिल आणि कुलाबा मतदारसंघामध्ये आघाडी घेता आली आहे.

दक्षिण मुंबई
विजय- अरविंद सावंत- शिवसेना (ठाकरे गट) ३९५६५५
पराभूत- यामिनी जाधव- शिवसेना (शिंदे गट) - ३४२९८२

या आमदारांना धोक्याची घंटा
मतदारसंघ- भायखळा
आमदार- यामिनी जाधव, शिवसेना (शिंदे गट)
या मतदारसंघात अरविंद सावंत यांनी ४६ हजार मतांची आघाडी घेतली आहे. विधानसभा निवडणुकीत या घटलेल्या मताधिक्क्यामुळे खडतर आव्हान यामिनी जाधव यांच्यापुढे राहणार आहे.
एकूण मतदान - १,३२,८०३
अरविंद सावंत- ८६,८८३
यामिनी जाधव- ४०,८१७

मतदारसंघ- वरळी
आमदार- आदित्य ठाकरे, शिवसेना (ठाकरे गट)
या मतदारसंघात आदित्य ठाकरे आपल्या पक्षाला चांगल्या मतांची आघाडी मिळवून देतील असे वाटत होते; मात्र सावंत यांना केवळ पाच हजार १६,२८५ मतांची मामुली आघाडी मिळाली आहे. त्यामुळे हा मतदारसंघ आदित्य ठाकरे यांना तेवढासा सोपा राहिलेला नाही.
एकूण मतदान - १,३०,८१३
अरविंद सावंत- ६४,८४४
यामिनी जाधव- ५८,१२९

या आमदारांनी किल्ला राखला
मतदारसंघ- मुंबादेवी
आमदार- अमिन पटेल, काँग्रेस
मुस्लिमबहुल असलेल्या या मतदारसंघातून काँग्रेसच्या अमिन पटेल यांनी अरविंद सावंत यांना ४० हजारांची निर्णायक आघाडी मिळवून दिली.
एकूण मतदान- १,१८,२००
अरविंद सावंत- ७७,४६९
यामिनी जाधव- ३६,६९०

मतदारसंघ- मलबार हिल
आमदार- मंगल प्रभात लोढा, भाजप
या मतदारसंघात यामिनी जाधव यांना सर्वाधिक म्हणजे तब्बल ६८ हजारांची लीड मिळवून दिली. या लीडमुळे यामिनी जाधव यांचे पराभवाचे अंतर कमी करण्यास मदत केली.
एकूण मतदान- १,३२,९९५
अरविंद सावंत- १९,५७३
यामिनी जाधव- ८७,८०७
...
मतदारसंघ- शिवडी
आमदार- अजय चौधरी, शिवसेना (ठाकरे गट)
शिवडी मतदारसंघाने अरविंद सावंत यांना १६ हजारांची लीड मिळवून दिली.
एकूण मतदान- १,४०,७२८
अरविंद सावंत- ७६,०५३
यामिनी जाधव- ५९,१५०

मतदारसंघ-कुलाबा
आमदार- राहुल नार्वेकर, भाजप
या मतदारसंघातून शिवसेना (शिंदे) गटाच्या यामिनी जाधव यांना ९,७३२ मतांची आघाडी मिळवून दिली.
एकूण मतदान- १,१३,६८५
अरविंद सावंत- ४८,९१३
यामिनी जाधव- ५८,६४५

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com