सूत्रकार येथे ट्रक उलटला

सूत्रकार येथे ट्रक उलटला

कासा (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर तलासरीजवळ सूत्रकार येथे गुजरातहून मुंबईकडे जाणाऱ्या वाहिनीवर ट्रकचा अपघात झाला. गुरुवारी (ता. ६ सकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान सूत्रकार येथे ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने महामार्गावरच उलटला. वाहनातील माल महामार्गावर इतरत्र पसरल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली होती. महामार्ग मदत केंद्र पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्वरित घटनास्थळी पोहोचत महामार्ग प्रशासनाच्या मदतीने जेसीबीच्या साह्याने महामार्गावर पडलेला माल बाजूला करत काही काळ झालेली वाहतूक कोंडी सोडवण्यात आली. यात कोणतीही मनुष्यहानी झाली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com