आर्थिक फसवणूकप्रकरणी पाच आरोपींना कोठडी

आर्थिक फसवणूकप्रकरणी पाच आरोपींना कोठडी

तारापूर, ता. ६ (बातमीदार) : दामदुप्पट परताव्याचे प्रलोभन दाखवत गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या पाच संशयित आरोपींना पालघर पोलिसांनी अटक केली. त्यांना गुरुवारी (ता. ६) आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी देण्यात आली.
बोईसरमधील यशवंतसृष्टी परिसरात कार्यालय असलेल्या पूजा इन्व्हेस्टमेंट कंपनीने दामदुप्पट आणि आकर्षक परताव्याचे प्रलोभन दाखवत शेकडो गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपये जमा केले होते. आठवडा आणि मासिक योजनांच्या नावाखाली नागरिकांनी गुंतवलेल्या रक्कमेवर १० ते १२ टक्के व्याज देण्याचे प्रलोभन दाखवले होते. या आकर्षक योजनांना भुलून पालघर जिल्ह्यातील अनेक नागरिकांनी आपली आयुष्यभराची बचत वेळप्रसंगी कर्ज काढून कोट्यवधी रुपये गुंतवले होते, मात्र कंपनीने नागरिकांनी गुंतवणूक केलेल्या मूळ रकमेसोबतच दामदुप्पट परतावा देण्यास टाळाटाळ करून जवळपास आठ कोटींपेक्षा अधिक रकमेची अफरातफर केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच १३ गुंतवणूकदारांनी पालघर येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे याप्रकरणी फिर्याद दिली होती.

फसवणूक झालेल्या नागरिकांच्या तक्रारीवरून पालघर आर्थिक गुन्हे शाखेने पूजा इन्व्हेस्टमेंट कंपनीचे संचालक हरीश विजय सिंह, सुनील राजकरण मिश्रा, विशाल तिलकचंद जैन, धवल वखारीया, अलेक्स वेल्स अशा एकूण पाच आरोपींवर गुन्हा दाखल करत अटक केली होती. त्यांना रविवारी (ता. २) न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. ही कोठडी संपल्यानंतर गुरुवारी पुन्हा न्यायालयात हजर केले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com