पोलिसांशी गैरवर्तणूक; तिघांवर गुन्हा

पोलिसांशी गैरवर्तणूक; तिघांवर गुन्हा

पोलिसांशी गैरवर्तणूक; तिघांवर गुन्हा

भिवंडी, ता. ६ (बातमीदार) ः वाहतूक नियंत्रणासाठी कर्तव्यावरील दोन पोलिस कर्मचाऱ्यांपैकी एका पोलिस कर्मचाऱ्याच्या पायावरून गाडी गेल्यानंतर तिघा अज्ञातांनी आपसांत संगनमत करून दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून एकास मारहाण केल्याची संतापजनक घटना भिवंडीतील वंजारपट्टी नाका परिसरात नुकतीच घडली.
याप्रकरणी तिघा अज्ञातांच्या विरोधात निजामपुरा पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये एक आरोपी २० ते २५ वयोगटातील असून दोन आरोपी ४० ते ४५ वयोगटातील आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निजामपुरा पोलिस ठाणे हद्दीतील वंजारपट्टी नाका हद्दीतील बागेफिरदोस मस्जिदच्या समोरील पेट्रोल पंपानजीक शहर पोलिस ठाण्यातील पोलिस शिपाई प्रल्हाद प्रभू सोनटक्के व भोईवाडा पोलिस ठाण्यातील पोलिस शिपाई घोडके हे दोघे ४ जूनला रात्री साडेअकराच्या सुमारास वाहतूक नियंत्रण करण्यासाठी कर्तव्यावर होते. त्यावेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका दुचाकीस्वाराने सोनटक्के यांच्या डाव्या पायावरून दुचाकी चढवली. त्यानंतर पोलिस कर्मचाऱ्यांनी दुचाकीस्वाराला धारेवर धरले असता नागरिकांनी गर्दी केली होती. त्या ठिकाणी तिघा अज्ञातांनी हस्तक्षेप करत पोलिस कर्मचाऱ्यांशी शाब्दिक बाचाबाची करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला व तिघांपैकी एकाने सोनटक्के यांना हाताच्या चापटीने पाठीमागून डोक्यात मारले. अन्य दोघांनी दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करण्यासह जमलेल्या नागरिकांना दोघा पोलिसांच्या विरोधात भडकवून त्यांना मारण्याची धमकी दिली आणि घटनास्थळावरून पळून गेले. त्यामुळे या गैरवर्तणूकप्रकरणी प्रल्हाद सोनटक्के यांच्या फिर्यादीवरून तिघा अज्ञातांवर निजामपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अज्ञातांचा शोध घेत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com